JOIN US
मराठी बातम्या / देश / बाप रे! लांबी 13 फुट तर वजन 80 किलो, गावात अजगर आढळला, गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ

बाप रे! लांबी 13 फुट तर वजन 80 किलो, गावात अजगर आढळला, गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ

गावात एका घटनेने मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

जाहिरात

महाकाय अजगर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अंजली शर्मा, प्रतिनिधी कन्नौज, 30 एप्रिल : शेतामध्ये साप आढळल्याच्या याआधी अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, उत्तरप्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कन्नौज जिल्ह्यातील गुगरापूर भागात एक महाकाय अजगर आढळल्यानंतर संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.

यानंतर अजगराला पाहण्यासाठी गावातील लोकांची गर्दी झाली होती. जो कोणी हा अजगर पाहत होता, त्याचे वजन आणि लांबी पाहून आश्चर्यचकित झाला. त्याचवेळी गावातील एका तरुणाने अजगराचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. एवढा मोठा अजगर या गावात यापूर्वी कधीच दिसला नव्हता. त्यामुळे या घटनेने गावात खळबळ उडाली. तब्बल 13 फूट लांब आणि 80 किलो वजनाचा हा अजगर होता. एका तरुणाने या महाकाय अजगराला जणू तो लहान प्राणी आहे, असे समजून पकडले. अजगर पकडल्याचा हा व्हिडिओ कन्नौजच्या गुग्रापूर भागात व्हायरल झाला आहे. अजगराला पाहून ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. घाईघाईत गावकऱ्यांनी अजगराला पकडण्यासाठी पथकाला पाचारण केले. पथकाने घटनास्थळी पोहोचून अजगराची सुटका केली आणि परत तो गावाकडे परत येऊ नये आणि जंगलातच राहावा, यासाठी त्याला सुरक्षित ठिकाणी सोडले. अशा स्थितीत एवढा मोठा अजगर पाहून गावकऱ्यांना धक्काच बसला. गावकऱ्यांची काय प्रतिक्रिया - स्थानिक रहिवासी पंकज यांनी सांगितले की, काही मुलांनी गुग्रापूर ब्लॉकजवळ एक मोठा अजगर पाहिला होता. मुलांनी याची माहिती गावातील ज्येष्ठांना दिली. त्यानंतर येथील काही तरुणांनी अजगराला पकडून वनविभागाला माहिती दिली आणि अजगराला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या