JOIN US
मराठी बातम्या / देश / बोटाच्या नखाइतकी हनुमान चालिसा, त्यातही सर्व पानांवर लॅमिनेशन, VIDEO

बोटाच्या नखाइतकी हनुमान चालिसा, त्यातही सर्व पानांवर लॅमिनेशन, VIDEO

जितेंद्र पाल सिंह हे व्यवसायाने शिक्षक असून ते एका खासगी शाळेत मुलांना चित्रकला शिकवतात.

जाहिरात

अनोखी हनुमान चालिसा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

संदीप सैनी, प्रतिनिधी हिसार, 25 जुलै : सनातन धर्मात हनुमानजी आणि हनुमान चालिसा यांचे विशेष स्थान आहे. जर तुम्ही सुद्धा सनातन धर्माशी संबंधित आहात, तर तुम्ही नक्कीच हनुमान चालिसा वाचली असेल. मात्र, तुम्ही कधी एक सेंटिमीटरची हनुमान चालिसा पाहिली आहे का? नाही ना. तर आता एका व्यक्तीने फक्त 1 सेंटिमीटरची हनुमान चालिसा बनवली आहे. जितेंद्र पाल सिंह असे या व्यक्तीचे नाव आहे. हरियाणा राज्यातील हिसार  येथील जितेंद्र पाल सिंह यांनी एक सेंटिमीटरच्या पुस्तकावर हनुमान चालिसा लिहून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. जितेंद्र पाल सिंग, हे सूक्ष्म कलाकृति बनविण्यात तरबेज आहेत. त्यांनी 1 सेंटीमीटरचा हनुमान चालिसा ग्रंथ बनवला आहे. तसेच जितेंद्र पाल सिंह यांनी दावा केला आहे की, त्यांनी एक सेंटीमीटर लांब आणि अर्धा सेंटीमीटर रुंद हनुमान चालीसा ग्रंथ तयार केला आहे. यामध्ये 15 पानांवर हनुमान चालीसा लिहिण्यात आली आहे. तर हनुमानजी यांनी पहाड उचललेला फोटो हा या ग्रंथाच्या वर आवरणावर लावला आहे. त्यांनी बनवलेल्या या पुस्तकाची सर्व 15 पाने खराब होऊ नयेत म्हणून जितेंद्र पाल सिंह यांनी त्यांना लॅमिनेटेडही केली आहेत.

लिहायला किती वेळ लागला - जितेंद्र पाल सिंह हे व्यवसायाने शिक्षक असून ते एका खासगी शाळेत मुलांना चित्रकला शिकवतात. जितेंद्र पाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही छोटी हनुमान चालीसा लिहिण्यासाठी त्यांना 15 दिवस लागले. लोकांना ही हनुमान चालीसा सहज वाचता येईल, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी सुमारे 70 सूक्ष्म कलाकृती बनवल्या आहेत. त्यांच्या अनेक बारीकसारीक कलाकृतींची नावे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ आणि एशिया बुक ऑफ मध्ये नोंदवण्यात आली आहेत. यासोबतच त्यांना अनेकवेळा शासकीय आणि निमसरकारी संस्थांकडून सन्मानितसुद्धा करण्यात आले आहे.

जितेंद्र पाल यांनी तांदळाच्या धान्यावर 118 देशांचे ध्वज, हरभऱ्याच्या दाण्यावर 10 शीख गुरुंची चित्रे, सर्वात लहान हनुमान चालिसासह 70 लघु कलाकृती बनवल्या आहेत. तसेच या कलाकृतींच्या माध्यातून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्डसह 35 रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. इतकेच नव्हे तर राज्याचे तत्कालीन राज्यपाल धनिक लाल मंडल यांच्या हस्ते जितेंद्र पाल यांना सन्मानित करण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या