नाशिक,27 ऑगस्ट: सध्याच्या कोरोनामुळे (Corona Virus) शेतमालाला अत्यल्प भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. कित्येक शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर (Tomato Prices) फेकून दिला आहे. गुरुवारी नाशिकच्या बाजार समितीत अवघड दोन ते तीन रुपये किलो या दराने टोमॅटो विकला जात होता. नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी (Nashik Farmers) क्रेट्सनं भरलेले टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले आहे. टोमॅटोला घाऊक बाजारात दोन ते तीन रुपयांनी घसरले. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
राज्याचे कृषिमंत्री असलेल्या दादा भुसे यांच्या जिल्ह्यातच टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
नाराज शेतकऱ्यांची शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी सायंकाळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. दरम्यान सरकारकडून किमान भाव आणि अनुदान मिळावं अशी मागणी करणार असल्याचं त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.