JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नागपूर / अनिल देशमुखांच्या मूळगावी EDची छापेमारी, गावकऱ्यांकडून 'चले जाव', 'मुर्दाबाद'च्या घोषणा Live Video

अनिल देशमुखांच्या मूळगावी EDची छापेमारी, गावकऱ्यांकडून 'चले जाव', 'मुर्दाबाद'च्या घोषणा Live Video

Anil Deshmukh house ed raid Ngapur: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नागपुर मधील काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे.

जाहिरात

अनेक वेळा चौकशी बोलावून देखील अनिल देशमुख आले नाहीत, त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 18 जुलै: माजी गृहमंत्री (Ex Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांच्या नागपुर (Nagpur) मधील काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने (ED Raid) छापा टाकला आहे. रविवारी सकाळपासूनच अंमलबजावणी संचलनालयाने छापेमारी सुरु केली. त्यानंतर आता ईडीचं पथक वडविहिरा येथून पाहणी पाहून करुन निघाले आहे. मात्र यावेळी गावकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ईडीच्या कारवाईविरोधात नारेबाजी केली आहे. गावकऱ्यांनी ईडीच्या कारवाईचा निषेध नोंदवला. ईडी “चलो जाव” आणि मुर्दाबादच्या घोषणा यावेळी गावकऱ्यांनी दिल्या आहेत.

तसंच अनिल देशमुखांच्या काटोल येथील देशमुखांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी ईडीविरोधात घोषणाबाजी केली आहे.

नागपूर जिल्ह्याच्या काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथे अनिल देशमुख यांचे वडिलोपार्जित घर आहे. या घरांमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी करत शोधमोहीम सुरु केली. अनिल देशमुखांची संपत्ती जप्त दोन दिवसांपूर्वी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने (ED) जप्त केली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (money laundering) ईडीने ही कारवाई केली. तब्बल चार कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केलीय. ईडीने अनिल देशमुख यांची स्थावर मालमत्ता जप्त केली. जप्त केलेल्या या स्थावर मालमत्तेची किंमत 4.20 कोटी रुपये इतकी आहे. मुंबईकरांसाठी काळरात्र; 21 जणांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान मोदींनी केली मोठी घोषणा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्या. अखेर या प्रकरणात अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्रिपदाचा सुद्धा राजीनामा द्यावा लागला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या