मराठी बातम्या /बातम्या /nagpur /RSS मुख्यालय दहशतवाद्यांच्या निशाण्यावर?, रेकी करणारा जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी अटकेत; ATS ची कारवाई

RSS मुख्यालय दहशतवाद्यांच्या निशाण्यावर?, रेकी करणारा जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी अटकेत; ATS ची कारवाई

जैश-ए-मोहम्मदच्या (Jaish-e-Mohammed)  एका दहशतवाद्याला (Terrorist) अटक केली आहे.

जैश-ए-मोहम्मदच्या (Jaish-e-Mohammed) एका दहशतवाद्याला (Terrorist) अटक केली आहे.

जैश-ए-मोहम्मदच्या (Jaish-e-Mohammed) एका दहशतवाद्याला (Terrorist) अटक केली आहे.

नागपूर, 18 मे: नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS office in Nagpur) कार्यालयाची रेकी केल्याप्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद (Maharashtra Anti-Terrorism Squad) विरोधी पथकाने (एटीएस) जैश-ए-मोहम्मदच्या (Jaish-e-Mohammed) एका दहशतवाद्याला (terrorist) अटक केली आहे. दहशतवादी रईस अहमद असदुल्ला शेख याने डॉ. हेडगेवार स्मृती भवन संकुलाची रेकी केली होती.

नागपूर ATS नं त्याला जम्मू-काश्मीर पोलिसांच्या प्रोडक्शन वॉरंटवर ताब्यात घेतलं आहे. रईस अहमद असदुल्ला शेख हा गेल्या वर्षी जुलैमध्ये नागपुरात आला होता आणि त्यानं डॉ. हेडगेवार स्मृती भवन संकुल आणि इतर काही महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केली होती. त्यानंतर त्याला जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली होती.

पाकिस्तानात बसलेल्या प्रमुख्यांच्या सांगण्यावरून रेकी

जम्मू-काश्मीर पोलिसांच्या चौकशीदरम्यान, पाकिस्तानातील जैश संघटनेत बसलेल्या सूत्रधारांच्या सांगण्यावरून या दहशतवाद्याने नागपुरात रेकी केल्याचं उघड झालं आहे. यानंतर नागपूर पोलिसांच्या अधिकाऱ्यांनीही काश्मीरमध्ये जाऊन त्याची चौकशी केली. आता रईसला एटीएसच्या नागपूर युनिटने पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

स्वतःच्याच लग्नात आलेलं Gift उघडत होता तरुण, पण नंतर घडला सर्वात Shocking प्रकार

जम्मू-काश्मीरमध्ये राहणारा दहशतवादी रईस अहमद असदुल्ला शेख याने 2021 मध्ये जैश या दहशतवादी संघटनेच्या सांगण्यावरून नागपुरातील आरएसएसच्या कार्यालयाची रेकी केली होती. रईस अहमदला जम्मू-काश्मीरमधील पंपोर येथून ग्रेनेडसह अटक करण्यात आली. नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाची रेकी केल्याचे त्याने पोलिसांच्या चौकशीत उघड केले होते.

First published:

Tags: Nagpur, RSS