JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / नाणार प्रकल्पावरून सेना आक्रमक,उद्धव ठाकरेंनी धर्मेंद्र प्रधानांची भेट नाकारली

नाणार प्रकल्पावरून सेना आक्रमक,उद्धव ठाकरेंनी धर्मेंद्र प्रधानांची भेट नाकारली

दरम्यान, उद्या उद्योगमंत्री सुभाष देसाई नाणार प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 जून : नाणार प्रकल्पावरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेतलाय. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट उद्धव ठाकरेंनी नाकारलीये. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाणार प्रकल्पावरून शिवसेना आणि भाजप यांच्यांत चांगलीच जुंपली. केंद्र सरकार नाणार प्रकल्पासंदर्भात करार करते आणि मुख्यमंत्री राज्यातील इतर मंत्र्यांना याची कल्पना देखील देत नाहीत हे गंभीर असल्याचं म्हणत शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाणार प्रकल्पावरून निषेध नोंदवलाय. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी उद्या गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट मागितली होती. मात्र उद्धव ठाकरेंनी ही भेट नाकारली. करारावर हस्ताक्षर झाल्यानंतर भेट कशाला असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थितीत केला.

‘आपले मुख्यमंत्री म्हणजे भोळे सांब, निष्ठावान सेवक’, सामानातून मुख्यमंत्र्यांबाबत व्यक्त केली चिंता

दरम्यान, उद्या उद्योगमंत्री सुभाष देसाई नाणार प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत  चर्चा करणार आहेत. तर नाणार प्रकल्पाला शिवसेना शेवटपर्यंत विरोध करणार असं दिवाकर रावते यांनी स्पष्ट केलंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या