JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / अखेर दिल्लीच्या बैठकीत ठरला फॉर्म्युला; गुरुपौर्णिमेला शिंदे सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता

अखेर दिल्लीच्या बैठकीत ठरला फॉर्म्युला; गुरुपौर्णिमेला शिंदे सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता

खाते वाटपावरुन मात्र पुन्हा शिंदे गटात नाराजी पसरू शकते, असं चित्र आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 जुलै : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, याबाबत वारंवार सवाल उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis) काल दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट (Amit Shah) घेतली. या भेटीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र आज शिंदे आणि फडणवीसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत काहीच माहिती दिली नव्हती. दरम्यान सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार, शिंदे सरकारचा शपथविधी 13 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. गुरुपौर्णिमा (Gurupournima 2022) असल्याने 13 जुलैला शपथविधी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस राष्ट्रवादीकडे जी खाती होती, ती भाजपकडे जातील तर शिवसेनेकडे जी खाती होती ती एकनाथ शिंदे गटाकडे जातील, असं सांगितलं जात आहे. दिल्लीतील बैठकीत हा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. गृह, वित्त, महसूल, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, जलसंपदा, आरोग्य, ऊर्जा, ही काँग्रेस राष्ट्रवादीकडे असलेली खाती भाजप स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आहे. नगरविकास, परिवहन, पर्यावरण, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उद्योग, मृदू व जलसंधारण यासारखी खाती शिंदे गटाकडे जातील, असंही सांगितलं जात आहे. यापूर्वीही कमी महत्त्वाची खाती मिळाली म्हणून शिवसेनेत नाराजी होती. त्यामुळे पुन्हा तोच फॉर्म्युला राबवणार असल्याने शिवसेनेच्या शिंदे गटात नाराजी पसरू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या