JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / ...आणि शरद पवारांनी राज ऐवजी उद्धव ठाकरेंना निवडलं!

...आणि शरद पवारांनी राज ऐवजी उद्धव ठाकरेंना निवडलं!

पवारांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 नोव्हेंबर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस महाआघाडीला मदत होईल, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली होती. तर मनसेला महाआघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसही आघाडीवर होती. मात्र सत्तेच्या राजकारणात पवारांनी राज ऐवजी उद्धव ठाकरेंना पसंती दिली. वर्षभरापूर्वी राज ठाकरेंनी शरद पवारांची प्रकट मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये रॅपिड फायर राऊंडमध्ये ‘राज ठाकरे की उद्धव ठाकरे’ असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर शरद पवारांनी अत्यंत चाणाक्ष्यपणं ठाकरे हे दिलेलं उत्तर आज सत्तेच्या सारीपाटावर सत्यात उतरताना दिसतंय. पवारांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राज ठाकरेंनी निवडणूक प्रचारात मोदींविरोधात आरोपांची राळ उडवली. मात्र, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं मनसेच्या महाआघाडीतील प्रवेशाला खोडा घातला. पण, आता राज्यातील सत्तासंघर्षात पवारांनी राज ऐवजी उद्धव ठाकरेंना पसंती दिली. त्यामुळेच राज्यात नवं राजकीय सत्तासमिकरण उदयास आलं आहे. खरंतर काँग्रेस महाआघाडीनं भाजप-शिवसेनेविरोधात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवली. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप-सेनेत फाटाफूट झाली.आणि राज्याच्या राजकारणात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी ही नवी महाविकास आघाडी उदयास आली. महाविकास आघाडीचा सत्तेचा फ़ॉर्म्युला ठरला आहे. पण निवडणुकीपूर्वी मनसेला आघाडीत घेण्यास विरोध करणारी काँग्रेस आता सत्तेत सेनेच्या मांडीला मांडी लावून बसणार आहे. राजकारणात कधीचं कोणी कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो हे राज्यातील राजकारणानं दाखवून दिलंय. ====================

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या