आणीबाणी हा देशाच्या लोकशाहीच्या सुवर्णपानावर लागलेला एक कलंक- मोदी

आणीबाणी हा देशाच्या लोकशाहीच्या सुवर्णपानावर लागलेला एक कलंक असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केलीय.

Sonali Deshpande
मुंबई, 26 जून : आणीबाणी हा देशाच्या लोकशाहीच्या सुवर्णपानावर लागलेला एक कलंक असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केलीय. तर आणीबाणीच्या काळातील काँग्रेसची मानसिकता आणि आताची काँग्रेसची मानसिकता सारखीच आहे, त्यांच्यात कोणतीही सुधारणा झाली नसल्याचं म्हणत मोदींनी काँग्रेसचे वाभाडे काढले.हेही वाचाकोल्हापूरात कंटेनर आणि स्कूल बसची जोरदार धडक, 2 जण ठार 26 जखमी

वडाळ्यात इमारतीच्या पार्किंगची भिंत कोसळल्यामुळे दोस्ती बिल्डर्सच्या विरोधात गुन्हा दाखल

 आराध्या बच्चन एक दिवस देशाची पंतप्रधान होणार, हैद्राबादच्या ज्योतिषाचं भाकितदेशावर लादलेल्या आणीबाणीला आज 43 वर्ष पूर्ण झालेत. त्यानिमित्ताने आणीबाणीविषयी आयोजित करण्यात आलेल्या विचारमंथनात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे- लोकशाही, संविधानप्रती आस्था असायला हवी.- आणीबाणी म्हणजे काय? सध्याच्या पिढीला माहीत नाही.- काळादिवस कॉंग्रेस विरोधासाठी नाही.- एका कुटुंबासाठी घटनेचा दुरुपयोग केला.- आणीबाणीच्या काळात संपूर्ण देश तुरुंगशाळा केला.- स्वार्थासाठी पक्षाचे तुकडे सुद्धा केले.- कॉंग्रेसमुळे न्यायव्यवस्था धोक्यात आली.- आणीबाणी, महाभियोग ही कॉंग्रेसची मानसिकता.- गायक किशोर कुमार यांची काय चुका होती, त्यांच्या गाण्यावर सुद्धा बंदी घालण्यात आली.- कॉंग्रेस लोकशाहीचा विचार कधीच करत नाही.- भाजपा आणि संघाच्या नावाने लोकांना घाबरवण्याचं काम केलं जातय.- मीडियासाठी राजीव गांधी यांनी कोणता कायदा आणला होता ते सर्वांना माहिती आहे.- ज्या पक्षात लोकशाही नाही, ते काय संविधान वाचवणार?- आणीबाणीच्या काळात सगळे दहशतीखाली होतेय- आमच्या सरकारने संसदेत संविधान दिन साजरा केला .- 400 जागांवरून 44 जागा झाल्याने काँग्रेसचे निवडणूक आयोगाला लक्ष्य केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज एका दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आज त्यांचा सगळ्यात पहिला कार्यक्रम एशियन इन्फास्ट्रक्चर इन्व्हेसमेंट बॅंकेच्या वार्षिक बैठकीला संबोधित करतील. या बॅंकेचं मुख्य उद्दिष्ट आशियाई देशांना पायाभूत सोयीसुविधा तयार करण्यासाठी मदत करणं आहे. यात देशातील अनेक मोठे उद्योगपती सहभागी असतील. त्यांच्याशी पंतप्रधानांची वेगळी बैठक असेल.

Trending Now