मुंबई, 03 जुलै : आज सकाळपासून जोरदार पडणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांचे मोठे हाल झाले. त्यावर चिंता व्यक्त करत अभिनेत्री रेणुका शहाणे हिने ट्विटरवर आपलं मत व्यक्त केल. पण आजकल काहीही बोललं तरी ट्रोल होणंच आहे. त्यामुळे अर्थात लोकांनी रेणुका शहाणेलाही ट्रोल केलं. रेणुका शहाणे काँग्रेसवाली आहे असं म्हणत तिच्यावर सगळ्यांनी टीका केली.
इतरांनी केलेल्या टीकेवर रेणुका शहाणे हिनेही त्यांना उत्तर दिलं आहे. मी माझं मत व्यक्त केलं यात माझं काय चुकलं असं म्हणत रेणुकाने सगळ्यांना सडेतोड उत्तर दिलं. ‘मुंबई कडून फक्त घेतलं जातं! जेवढी लोकसंख्या आहे त्या मानानी मुंबई साठी दिले जाणारे पैसे नेहमीच कमी असतात ही खंतं आहे! ’ असं ट्विट केल्यावर रेणुका शहाणे काँग्रेसची आहे अशी टीका तिच्यावर करण्यात आली.
पण स्वच्छतेबद्दल मी बोलले तर माझं चुकलं कुठे अशा शब्दात परत रेणुका शहाणेनी उत्तर दिलं. ‘अरे काय यार! आपण राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन भारतीय नागरिक म्हणून विचार करूच नये का? भारतीय असणं महत्त्वाचं की कुठल्या राजकीय पक्षांचा बचाव महत्त्वाचा?’ असंही ट्विट करत ती सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर देत आहे.