मुंबई, 4 ऑगस्ट : मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. मिठी नदीने काही वेळापूर्वी अतिधोकादायक पातळी गाठली होती. नदीलगतच्या घरांमधल्या लोकांना महापालिकेनं स्थलांतरित केलं आहे. 26 जुलै 2005 ला आलेल्या महापुराची आठवण देणारं रूप धारण केलं होतं. भरतीच्या वेळेपूर्वी पावसाचा जोर कमी झाल्यामुळे मुंबई या वेळी थोडक्यात वाचली.