JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / BREAKING : दुसऱ्या दिवशीही 'वर्षा'वर हालचालींना वेग, उद्धव ठाकरे-अजित पवारांची बैठक

BREAKING : दुसऱ्या दिवशीही 'वर्षा'वर हालचालींना वेग, उद्धव ठाकरे-अजित पवारांची बैठक

सचिन वाझे अटक प्रकरणानंतर महाविकास आघाडी सरकारने तातडीने डॅमेज कंट्रोल सुरू केले आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 मार्च : मुंबईमध्ये स्फोटकांनी भरलेली कार सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) अटकेचे महाविकास आघाडी सरकारमध्ये **MVA Government)**पडसाद उमटले आहे. आज दुसऱ्या दिवशी सुद्धा वर्षा बंगल्यावर बैठका सुरूच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात महत्त्वाची बैठक सुरू आहे. सचिन वाझे अटक प्रकरणानंतर महाविकास आघाडी सरकारने तातडीने डॅमेज कंट्रोल सुरू केले आहे. सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मंत्रिमंडळात खांदेपालट करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारमध्ये आता बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले. भाजपला आणखी एक धक्का, राष्ट्रवादीच्या खेळीमुळे नगरमध्ये खळबळ या बैठकीला शिवसेनेचे नेते अनिल परब हे देखील उपस्थितीत आहे. तसंच गृहमंत्री अनिल देशमुख, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित आहेत. सचिन वाझे प्रकरणाबरोबर पोलीस आयुक्त बदली? राज्यातील कोरोना परिस्थिती आणि जळगाव महापालिका याबाबत ही बैठक होत आहे. विशेष म्हणजे,  पूजा चव्हाण (Pooja Chavan), सचिन वाझे (Sachin Vaze Arrested) अटक प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकार बॅकफूटवर गेले आहे. त्यामुळे तातडीने डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी सूत्र फिरवली. वर्षा बंगल्यावर जाऊन शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा प्रस्ताव मांडला. पुण्यातील 70 वर्ष जुन्या मार्केटमध्ये भीषण आग, 25 दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले. त्यानंतर तिन्ही नेत्यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करण्यास एकमत व्यक्त केले.  ‘मंत्रिमंडळात फेरबदलासंदर्भात सोनिया गांधी, शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील. लवकरच तुम्हाला याबद्दल कळेल, अशी सूचक प्रतिक्रिया नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर दिली. मिळालेल्या माहितीनुसार, होळी आणि पौर्णिमेनंतर महाविकास आघाडीतील काही मंत्र्यांचे खाते हे बदलले जाणार आहे. अनिल देशमुख यांचे गृहमंत्रिपद जाणार? अनिल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी असले तरी त्यांच्या कामगिरीवर नाराज असल्याचे बोललं जात आहे. गेले वर्षभर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खात्यावर अनेक प्रश्नं उपस्थित करण्यात आले होते. सुशात सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण ते आताचे सचिन वाझे प्रकरणापर्यंत गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख चोख कामगिरी करू शकले नाहीत, अशी भूमिका महाविकास आघाडीच्या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांमध्ये आहे. वनमंत्रिपदी कुणाची वर्णी? शिवसेनेचे रिक्त झालेले वन मंत्रालय तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील गृहमंत्रिपदी नवीन मंत्र्यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे.  वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा याआधीच मंजूर झाला असल्यामुळे त्यांच्या खात्याची जबाबदारीही शिवसनेच्या मंत्री मंडळाबाहेरील नव्या व्यक्तीवर सोपवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या