... म्हणून 'सेक्स टॉक'साठी एक्स- प्रियकराच्या कुटुंबियांचे तयार केले FB अकाऊंट

प्रेयसीने एक्स- प्रियकराच्या कुटुंबियांचा असा घेतला बदला

मुंबई, 09 जुलैः असं म्हणतात की, प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं. पण प्रत्येक गोष्टीला जसे अपवाद असतात तसाच या गोष्टीलाही आहे. आरती (22) आणि तिचा प्रियकर लग्नाचा विचार करत होते. मात्र प्रियकराच्या कुटुंबियांनी लग्नाला नकार दिल्यामुळे त्यांचे लग्न मोडले. नेमकी याच गोष्टींचा बदला घेण्यासाठी आरतीने प्रियकराच्या कुटुंबियांच्या नावे फेसबुकवर फेक अकाऊंट सुरू केले. एवढ्यावरच आरती थांबली असे नाही. या अकाऊंटवरून तिने अश्लिल व्हिडिओ आणि फोटोही शेअर केले. तसेच त्या अकाऊंटवर सेक्स चॅटसाठी त्यांचे खरे नंबर सेव्हही केले.'मिड-डे'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, गोरेगावला राहणारी आरती आठ वर्षांपासून विलेपार्ले स्थित महेशसोबत रिलेशनशिपमध्ये होती. लग्नात जातमध्ये आली आणि महेशने घरच्यांचे ऐकत तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. तसेच त्याने घरच्यांनी सांगितलेल्या मुलीशी लग्न करण्यासही होकार दर्शवला. महेशच्या या निर्णयाने आरती पुरती कोलमंडली आणि तिने तिच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याचे ठरवले.आरतीने त्या फेकअकाऊंटवरुन अनेकांना फ्रेंड रिक्वेस्टही पाठवल्या. महेशच्या दोन बहिणींना अनेकांचे अश्लिल कॉल आणि मेसेज येऊ लागले. अखेर महेशच्या कुटुंबियांनी विलेपार्ले पोलीस स्थानकात रितसर तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर या सर्व प्रकारात आरतीचाच हात असल्याचे स्पष्ट झाले. आरतीवर सेक्शन नंबर 419 आणि 500 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचाःपश्चिम मुंबईमध्ये 'या' ठिकाणी होतोय मुसळधार पाऊसमध्य रेल्वेचा खेळ खंडोबा, या भागांमध्ये भरले पाणीथायलंडः गुफेत अडकलेल्या मुलांनी असा साजरा केला वाढदिवस

Trending Now