JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / महाविकास आघाडी सरकार अस्थिर? थोरातांनी स्पष्ट केली काँग्रेसची भूमिका

महाविकास आघाडी सरकार अस्थिर? थोरातांनी स्पष्ट केली काँग्रेसची भूमिका

‘भाजपची नेते मंडळी असंतुष्ट असून सत्तेची लालसा त्यांना आहे. त्यांना असं वाटतं की, काही तरी करावं आणि सरकार पाडावं’

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 मे : कोरोना व्हायरसच्या बिकट परिस्थितीत राज सरकार अस्थिर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी, ‘आमचे सरकार स्थिर आहे. तिन्ही पक्षाचे नेते समन्वय साधून काम करत आहे. लोकं विनाकारण गैरसमज निर्माण करण्याचे काम करत आहे’, असा स्पष्ट खुलासा केली आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. त्यांच्या मागणीनंतर राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला. खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधी राज्यपालांची भेट घेतली त्यानंतर मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. **हेही वाचा -** पुढचे 5 दिवस या राज्यांसाठी धोक्याचे, हवामान खात्याने दिली महत्त्वाची माहिती तर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे.  ‘सरकारच्या स्थिरतेविषयी विनाकारण गैरसमज निर्माण केला जात आहे. पण आमचे महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे. आमच्यात समन्वय नाही अशी कोणतीही बाब नाही. आमची रोज अनेक वेळा चर्चा होत असते, भेठीगाठी होत असतात. त्यामुळे सरकार अस्थिर असल्याचा गैरसमज पसरवला जात आहे. सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहे’,  असं थोरात म्हणाले. बाळासाहेब थोरातांचा राणेंना टोला ‘भाजपची नेते मंडळी असंतुष्ट आहे. सत्तेची लालसा त्यांना आहे. त्यांना असं वाटतं की, काही तरी करावं आणि सरकार पाडावं. तसे पाहिले तर त्यांच्याकडे पूर्ण संख्याबळ नाही. त्यामुळे सरकारला त्रास देण्यासाठी त्यांचा रोज खटाटोप सुरू आहे. उलट कोरोनाच्या परिस्थितीत मदत करण्याची गरज आहे. पण, भाजपचे नेते राज्यपालांच्या भेटीगाठी घेत आहे. त्यांच्या या भेटींमुळे सरकारला काही फरक पडणार नाही, असं म्हणत थोरात यांना नारायण राणेंसह भाजप नेत्यांना  टोला लगावला. नारायण राणेंची थोरातांवर टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार हे सोमवारी संध्याकाळी  ‘मातोश्री’वर गेलेच नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासोबत अशी कोणतीही बैठक झालीच नाही, असा दावा भाजपचे नेते  नारायण राणे यांनी केला आहे. हेही वाचा -  पुढचे 5 दिवस या राज्यांसाठी धोक्याचे, हवामान खात्याने दिली महत्त्वाची माहिती तसंच,  ‘शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं महाविकास आघाडी सरकार हे 5 वर्षं टिकणार नाही.   कोरोनाला रोखण्यात सरकार सपशेल अपयशी त्यामुळे राज्यात राष्ट्रपती लावली पाहिजे, अशी मागणी पुन्हा एकदा नारायण राणे यांनी केली. ‘काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना आपल्या मंत्रिपदाची चिंता आहे. त्यामुळे ते सरकार टिकेल असं म्हणत आहे’, असा टोलाही राणेंनी लगावला होता. सत्ता स्थापनेनंतर शरद पवार पहिल्यांदाच ‘मातोश्री’वर दरम्यान, सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची महत्वाची बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, बैठकीत फक्त  उद्धव ठाकरे,  शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत हेच उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील आणि केंद्रातील महत्वाच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचं समजतं आहे. **हेही वाचा -** ….आणि दोन लेकरांसमोर ‘तो’ ढसाढसा रडला विशेष म्हणजे, सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार यांनी मातोश्रीची पायरी चढलली. यावेळी त्यांनी राज्यातील परिस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त केल्याचंही समजतं आहे. येत्या गुरुवारी महाविकास आघाडीला 6 महिने पूर्ण होतायत त्याआधीच या सरकारवर सत्ता जाण्याचे ढग दाटले, असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या