JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Ajit Pawar Speech : 'तुम्ही थांबणार आहात की नाही' अजितदादांचा थेट शरद पवारांना सवाल

Ajit Pawar Speech : 'तुम्ही थांबणार आहात की नाही' अजितदादांचा थेट शरद पवारांना सवाल

Pawar vs Pawar Maharashtra Political Crisis updates : ‘आजही ते माझं दैवत आहे आजही ते श्रद्धास्थान आहे. एखादा माणूस नोकरीला लागला की 58 व्या वर्षी रिटायर होतो. राजकीय जीवनात असेल तर भाजपमध्ये 75 व्या वर्षी रिटायर केलं जातं. चुकलं तर सांगा अजित तुझं चुकलं, चूक मान्य करून दुरुस्त करून पुढे जाऊ

जाहिरात

(अजित पवार)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 जुलै : ’ आपले वरिष्ठ नेते चव्हाण साहेबांच्या समाधीला गेले. माझ्याकडूनही घोडचूक झाली होती. मी सुद्धा तिथे बसलो होतो. काल आता जर वय जास्त झालं, 82 झालं, 83 झालं, आता तुम्ही थांबणार आहात की नाही, तुम्ही आशीर्वाद द्याना. तुम्ही शतायुषी व्हावं’ असं म्हणत अजित पवार यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वयावर भाष्य केलं. राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी केल्यानंतर अजित पवार यांच्या गटाचा मेळावा मुंबईत सुरू आहे. यावेळी अजित पवार यांनी जोरदार भाषण करत थेट शरद पवारांवरच निशाणा साधला आहे. ‘आजही ते माझं दैवत आहे आजही ते श्रद्धास्थान आहे. एखादा माणूस नोकरीला लागला की 58 व्या वर्षी रिटायर होतो. राजकीय जीवनात असेल तर भाजपमध्ये 75 व्या वर्षी रिटायर केलं जातं. चुकलं तर सांगा अजित तुझं चुकलं, चूक मान्य करून दुरुस्त करून पुढे जाऊ. आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो ही चूक आहे आमची? वरिष्ठ नेते चव्हाण साहेबांच्या समाधीवर गेले. माझी घोडचूक झाली तेव्हा मीही गेलो होतो. वय 82 झालं 83 झालं तुम्ही कधी थांबणार आहात का नाही, तुम्ही आशिर्वाद द्या ना. तुम्ही शतायुषी व्हावं.2 मे ला सांगितलं मी राजीनामा देतो, तुम्ही सगळे प्रमुख बसा कमिटी बनवा आणि सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा असं सांगितलं. आम्ही तयार होतो. मग दोन दिवसात काय घडलं कुणास ठावूक,. राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला तेही कळलं नाही. आमच्यामध्ये धमक किंवा ताकद नाही का सरकार चालवायची. महाराष्ट्राच्या राजकारणात जे चार पाच प्रमुख नेते म्हणून पाहिले जातात त्यात माझं नाव येतं का नाही. मग मला आशिर्वाद का दिला जात नाही.शेतकरी मुलगा २५ वर्षाचा झाला की सांगितलं जात आता तू शेती बघायची मी सल्ला देतो. मी सुप्रियालाही बोललो, ते हट्टी आहेत. असला कसला हट्ट आहे’ असा सवालही अजितदादांनी केला.

‘प्रचंड बहुमत आहे, आमदारांची काम होतील. वैयक्तिक स्वार्थाकरता पक्षाने निर्णय घेतलेला नाही. काही आमदार उपस्थित राहू शकले नाहीत. काही दवाखान्यात आहेत, काही तिकडच्या मीटिंगला गेले आहेत, ते माझ्या संपर्कात आहेत. मी राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये भेदभाव केला नाही आणि करणार नाही. शिवसेना-भाजपच्या आमदारांना सांगायचं आहे. माझी प्रतिमा दबंग नेता, कडक नेता स्वत:ला पाहिजे ते करतो, अशी झाली आहे. पण मी तसं करणार नाही. 2014 ला फडणवीस मुख्यमंत्री झाले, आम्ही सिल्व्हर ओकला बसले होते. प्रफुल भाई आणि साहेबांचं काय बोलणं झालं. प्रफुल भाईंनी सांगितलं भाजपला बाहेरून पाठिंबा देतो, आम्ही गप्प बसलो नेत्यांचा निर्णय. वानखेडेला शपथविधीला जा, सांगितलं आम्ही गेलो. मोदी साहेब मला ओळखतात मी त्यांना ओळखतो. मोदी साहेबांनी साहेबांची तब्येत विचारलं. ते भुजबळ साहेबांशी बोललो. त्यांच्याबरोबर जायचं नव्हतं तर आम्हाला का पाठवलं. शपथविधीला का जायला सांगितलं? असा सवाल अजितदादांनी केला. 2017 ला प्रांताध्यक्ष सुनिल तटकरे, अजित पवार, जयंत पाटील बाकीचे वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. समोरून सुधीर मुनगंटीवार, फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांतदादा हे चौघं होती. कोणती खाती, कोणती पालकमंत्री पदं सगळं, मी महाराष्ट्राला खोटं बोलणार नाही. खोटं बोललो तर पवारांची अवलाद सांगणार नाही. सगळं ठरलं, निरोप आला तटकरेंना दिल्लीला बोलावलं. त्यांच्या वरिष्ठांबरोबर आपले वरिष्ठ मीटिंग झाली. 25 वर्ष आमचा मित्रपक्ष आम्ही सोडणार नाही, असं सांगितलं. तेव्हा आमचे वरिष्ठ म्हणले शिवसेना आम्हाला चालत नाही शिवसेना चालत नाही. भाजप म्हणाले आम्ही शिवसेनेला सोडणार नाही’ 2019 ला निकाल लागले, परिस्थिती काय होती माहिती आहे. मोठे उद्योगपतीच्या घरी, आपले वरिष्ठ नेते, दुसरे वरिष्ठ नेते पटेल, उद्योगपती भाजपचे वरिष्ठ नेते मी आणि देवेंद्र फडणवीस सगळी चर्चा झाली. पाच बैठका त्याच बंगल्यात झाल्या. मला आणि देवेंद्रला सांगितलं कुठे बोलायचं नाही. नेत्यांनी सांगितलं म्हणून बोललो नाही. मला कुणाला बदनाम होऊन द्यायचं नाही. हे सगळं सुरू असताना अचानक बदल झाला आणि सांगितलं शिवसेनेसबोत जायचं. २०१७ ला शिवसेना जातीयवादी आणि दोन वर्षांनी ते मित्रपक्ष झाला आणि भाजपसोबत जाणार होतो तो भाजप जातीयवादी झाला. असं चालत नाही. उद्धव ठाकरेंचं सरकार आलं तेव्हा मला उपमुख्यमंत्री केलं, मी हूं का चू केलं नाही. कोरोनाचा काळ होता मी कधीही हलगर्जीपणा दाखवला नाही’ असंही पवार म्हणाले. ‘सगळ्या आमदारांनी पत्र लिहिलं सरकारमध्ये सामील व्हावं म्हणून. सगळ्या आमदारांनी सह्या केल्या. पटेल, अजित पवार आणि जयंत पाटलांची कमिटी केली. भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं अशी गोष्ट फोनवर बोलून चालत नाही. इंदूरला बोलावलं, पण मीडियाला कळेल म्हणून तिकीट रद्द केलं. तोपर्यंत एकनाथ शिंदे यांचा शपथविधी झाला नव्हता. सगळ्या आमदारांच्या पत्राची झेरॉक्स कॉपी माझ्याकडे आहे. लोकांच्या समोर मला व्हिलन का केलं जातं कळत नाही. काय माझी चूक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या