JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Coronavirus in Maharashtra: मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाचा संसर्ग, खासदार अरविंद सावंतही कोविड पॉझिटिव्ह

Coronavirus in Maharashtra: मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाचा संसर्ग, खासदार अरविंद सावंतही कोविड पॉझिटिव्ह

Coronavirus spike in Maharashtra : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना एकामागे एक मंत्री, आमदार आणि खासदार कोरोना बाधित होत असल्याचं समोर येत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 जानेवारी : महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) खूपच वेगाने होताना दिसत आहे. राज्यातील मंत्री, आमदार आणि खासदारांना कोरोनाचा संसर्ग (Politicians tests positive for covid-19) होताना दिसून येत आहे. आता राज्यातील आणखी एक मंत्री आणि खासदार कोरोना बाधित झाले आहेत. राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून शिवसेनचे खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. (Minister Eknath Shinde and Shiv Sena MP Arvind Sawant tests positive for covid-19) नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत म्हटलं, “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत.आपणां सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी.” वाचा :  पुणे जिल्हा बँक निवडणुकीत अजित पवारांना मोठा झटका, धक्कादायक निकाल आला समोर   

तर खासदार अरविंद सावंत यांनीही आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं म्हटलं आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं, “माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याने मी स्वतः विलगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या.!”

वाचा :  “…तर मुंबईत लॉकडाऊन लावणार” मुंबई मनपा आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं काल  सकाळीच भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. मुंबई आणि पुण्यासह संपूर्ण राज्यभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना आणि मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतात कोरोनाची तिसरी लाट धडकलीच भारतात कोरोनाच्या रुग्ण संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता भारताच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. भारतात कोरोनाची तिसरी लाट आली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच ओमायक्रॉन बाधितांपैकी 75 टक्के रुग्ण हे देशातील प्रमुख महानगरांमध्ये आढळून आले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ज्यामध्ये मुंबई, दिल्ली, कोलकाता सारख्या शहरांचा समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या