Home /News /pune /

Pune District Bank Election: जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचा एकहाती वरचष्मा पण अजित पवारांना धक्का

Pune District Bank Election: जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचा एकहाती वरचष्मा पण अजित पवारांना धक्का

Pune District bank Election result: पुण्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे निकाल आता समोर आले आहेत. रविवारी बँकेच्या सात जागांसाठी मतदान प्रक्रिया पडली होती.

पुणे, 4 जानेवारी : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Pune District Cooperative Bank Election Result) सात जागांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पर पडली होती. या सात जागांचे निकाल आता आले आहेत. जिल्हा बँकेवर यापूर्वीचा 21 पैकी 14 संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित 7 जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. आज सकाळी अल्पबचत भवन येथे मतमोजणी झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) एकहाती सत्ता मिळवत वर्चस्व मिळवलं आहे. निवडणुकीत अजित पवारांना धक्का या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकहाती सत्ता मिळवली असली तरी अजित पवार (Ajit Pawar) यांना एक मोठा धक्का बसला आहे. कारण, अजित पवार यांचे एकेकाही निकटवर्तीय असलेले आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपत गेलेले प्रदीप कंद हे विजयी झाले आहेत. या निवडणुकीत प्रदीप कंद यांना पराभूत करण्यासाठी अजित पवारांनी रणनीती आखली होती. मात्र, असे असतानाही प्रदीप कंद हे 11 मतांनी विजयी झाले आहेत. तक्यामुळे प्रदीप कंद यांचा विजय हा अजित पवारांसाठी एक मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. या निवडणुकती तालुका विकास सोसायटी अ वर्ग मतदार संघातून शिरूरमधून आमदार अशोक पवार विजयी झाले आहेत. हवेलीमधून विकास दांगट विजयी झाले आहेतर तर मुळशी तालुक्यातून सुनील चांदेरे विजयी झाले आहेत. निवडणूक निकालांची घोषणा होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यंनी गुलालाची उधळण केली. वाचा : अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात धाव घेतलेल्या नितेश राणेंसाठी न्यायालयातून आली मोठी बातमी मुळशी तालुका मतदारसंघातून बॅंकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे यांना धक्का देत राष्ट्रवादी कॉंगेसच्या सुनील चांदेरे यांचा विजय झाला आहे. सुनील चांदोरे यांना 28 मते मिळाली, तर कलाटे यांना 17 मते मिळाली. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत यापूर्वी 8 संचालकांची बिनविरोध निवड झाली होती. त्यामध्ये अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांची पूर्वीच बिनविरोध निवड झाली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच आमदार अशोक पवार 73 मतांनी विजयी झाले आहेत. भारतीय जनता पक्षाचे आबासाहेब गव्हाणे यांचा त्यांनी पराभव केला आहे. विजयी उमेदवार आणि मिळालेली मते आमदार अशोक पवार - विजयी - 109 मते विकास दांगट - विजयी - 73 मते सुनील चांदेरे - विजयी - 27 मते
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Ajit pawar, Bank, Pune

पुढील बातम्या