JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Uddhav Thackeray : शरद पवारांचा दाखला देत उद्धव ठाकरेंचा थेट पंतप्रधान मोदींना खोचक सवाल, म्हणाले...

Uddhav Thackeray : शरद पवारांचा दाखला देत उद्धव ठाकरेंचा थेट पंतप्रधान मोदींना खोचक सवाल, म्हणाले...

Uddhav Thackeray Controversial Remark At Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीवर आरोप केला होता. आता पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार शरद पवार यांच्या उपस्थितीत दिला जाणार आहे.

जाहिरात

(उद्धव ठाकरे)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 जुलै : ‘लोकमान्य टिळक पुरस्कार हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार शरद पवार यांच्या हस्ते दिला जाणार आहे. मग 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचं झालं काय? व्यासपीठावर कोण कोण असणार आहे. तारत्मयचं काही कळतं नाही, सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे की नाही. लोकमान्य टिळकांनी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असं विचारलं होतं. मग कोण कलंकित याचा विचार केला पाहिजे, असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला. उद्धव ठाकरे यांच्या कलंक शब्दामुळे चांगलाच वाद पेटला आहे .भाजपने जोरदार आक्षेप घेत राज्यभरात निदर्शनं केली आहे. याच मुद्यावर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचा खडेबोल सुनावले आहे.

माझ्या झालेल्या ऑपरेशनवरून चेष्टा करतात, माझ्या कंबरेचा पट्टा सुटला, मानेचा पट्टा सुटला, मी असं करत नाही, जे भोगलं ते कुणी भोगू नये, कुणाच्या कुटुंबाबद्दल बोलतात, कुणाच्या आजाराबद्दल बोलतात, एवढ्या खालच्या पातळीला जातात. मग की लोक कलंकच आहे, महाराष्ट्राला कलंकच आहात, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीवर आरोप केला होता.  आता पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार शरद पवार यांच्या उपस्थितीत दिला जाणार आहे. मग 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचं झालं काय? व्यासपीठावर कोण कोण असणार आहे. तारत्मयचं काही कळतं नाही, सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे की नाही. लोकमान्य टिळकांनी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असं विचारलं होतं. मग कोण कलंकित याचा विचार केला पाहिजे, असा ट त्यात एवढं लागण्यासारखं काय आहे, ज्यांना माझा हा शब्द लागला आहे. तुम्ही जेव्हा एखाद्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करतात. तेव्हा कलंक लावत नाही, एखादं कुटुंब भ्रष्ट आहे, हा कलंक तुम्ही लावत नाही का? मग माझं असं म्हणणंय हसन मुश्रीफ यांच्या पत्नीने रस्त्यावर आक्रोश करत सारख्या ईडीच्या धाडी टाकण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घालून ठार मारा असं म्हणाल्या होत्या. आता हसन मुश्रीफ हे मांडीला मांडीला लावून बसला आहे. आज मला बरं वाटतंय, कालपर्यंत हे बोलत होते बाळासाहेबांना अटक करणारे, काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसला मला आज कळलं, यांना सुद्धा मांडी आहे. हे सुद्धा दुसऱ्या मांडीला मांडी लावत आहात. एकीकडे तुम्ही भ्रष्ट असा आरोप करताय आणि त्याच माणसाला मंत्रिमंडळात स्थान देतात. तुम्ही म्हणाल भ्रष्ट आणि तुम्ही म्हणाल तो देव, हे कोणतं हिंदुत्व आहे, असा सवालच उद्धव ठाकरेंनी केला. (भुजबळांसह अजितदादांनाही जीवे मारण्याची धमकी, आरोपीचा धक्कादायक खुलासा) ‘तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करून कलंकित करतात आणि त्याच व्यक्तीला मंत्रिमंडळात स्थान देऊन बाजूला मांडीला मांडी लावून स्थान देतात. त्या कुटुंबाने समाजात वावरायचं कसं? मग त्यांच्यावरच आरोप होते ते खोटे होते का? तुम्ही त्यांना भ्रष्टचारी का म्हणाला. नितीन गडकरी यांना सुद्धा या अनुभवातून जावं लागलं आहे. पूर्वी मी अफजल खानाची स्वारी बोललो होतो. शिवचरीत्र सगळ्यांनी वाचलं आहे. जानता राजा बघितलंय, त्यामुळे अफजल खानाची स्वारी आली आहे. एकतर तुम्ही आमच्यात सामील व्हा, धर्मांतर करा, नाहीतर कुटुंबासह मारले जाल, असा खलिता होता. आता ईडी, सीबीआय घरात घरात घुसवले आहे, याचा अर्थ असाच होत नाही का? तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करून कलंकित करत नाही का आधी हे थांबवा, त्याचा कलंक लागत नाही. तुम्हाला फक्त जाणीव करून दिली तर एवढी आग का लागली, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. ( Sharad Pawar : ‘माझ्या पुतण्याने सांगितल्यानंतर मी…’ छगन भुजबळ यांचा शरद पवार यांना खोचक टोला ) ईडीचा सत्तेचा गैरवापर करत आहात, लोकांनी उद्ध्वस्त करत आहात, कुटुंबाची मानसिक शांती हिरावून घेताय आणि ते सगळं झाल्यानंतर तुम्ही त्यांना पक्षात घेऊन मानाचं पान वाढतात, मग त्या कुटुंबाने समाजात वावरायचं कसं? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या