14 एप्रिल : मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर आघाडी सरकारच्या कारभारावर बरेच ताशेरे उडाले होते. त्यानंतर किती कमी काळात आपण मंत्रालयाची यंत्रणा पूर्वरत करू शकलो याबाबत सरकारने स्वत:ची पाठही थोपटुन घेतली होती. मात्र, मंत्रालयाला लागलेल्या आगीला जबाबदार कोण या प्रश्नाचं उत्तर सरकारकडून आजूनही मिळेलं नाहीये. शिर्डीचे RTI कार्यकर्ते संजय काळे यांनी याबाबत सातत्याने केलेल्या पाठपुराव्यातून तीन बाबी उघड झाल्यात. नूतनीकरणासाठी 95 कोटी रुपये खर्च करण्यात आले. या आगीत 63 हजार फाईल जळून खाक झाल्या मात्र, या प्रकरणी कोणावर गुन्हा दाखल करण्यात आला याचं उत्तर देण्यात आलेल नाही.