01 जानेवारी : जगभरात नववर्षाचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं पण ठाणे जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यात अनिंसनं वेगळ्या पद्धतीनं नव्या वर्षाचं स्वागत केलंय. अंनिसनं विद्यार्थ्यांच्या मदतीनं माणच्या स्मशानभुमीत थर्टी फस्ट पार्टी साजरी केली. भुतांविषयी आदिवासींच्या मनातली भीती आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अंनिसनं हा उपक्रम हाती घेतला.