नवी दिल्ली, 22 जुलै: तुम्ही देखील झोमॅटोच्या आयपीओमध्ये (Zomato IPO) तुम्ही पैसे गुंतवले असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आजपासून तुम्ही कंपनीच्या शेअर्सची अलॉटमेंट (Zomato IPO share allotment) तपासू शकता. यामध्ये तुम्ही तपासू शकता की तुमच्या खात्यामध्ये शेअर्स आले आहेत की नाहीत. तुम्हाला जर शेअर्स नाही मिळालेत तर तुमचे फ्रीजचे पैसे परत मिळतील. तुम्ही दोन मार्गांनी शेअर अलॉटमेंट तपासू शकता. पहिलं तुम्ही BSE च्या ऑफिशियल वेबसाइटवरुन (BSE website) आणि दुसरं म्हणजे रजिस्ट्रार वेबसाइटच्या माध्यमातून तुम्ही शेअर अलॉटमेंट तपासू शकता. झोमॅटो इश्यू करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत 40.4 पटींनी सब्सक्राइब झाले आहे. हा भारतातील सर्वात मोठ्या आयपीओपैकी एक आहे, या आयपीओच्या माध्यमाचून झोमॅटो 9375 कोटींचा फंड उभा करत आहे. रजिस्ट्रारच्या वेबसाइटवरुन तपासा अलॉटमेंट -सर्वात आधी तुम्हाला या https://linkintime.co.in/IPO/public-issues.html लिंकवर भेट द्यावी लागेल -यानंतर ड्रॉपडाउन करून आयपीओचं नाव सिलेक्ट करा -यानंतर DP ID किंवा Client ID किंवा PAN प्रविष्ट करा -तुमच्याकडे अॅप्लिकेशन क्रमांक असेल तर तो टाइप करा -आता DP ID किंवा Client ID असेल तर NSDL किंवा CDSL पैकी तुमचा डिपॉझिटरी निवडा आणि तुमचा DP ID किंवा Client ID प्रविष्ट करा हे वाचा- PM kisan: 27 लाख शेतकऱ्यांचं ट्रान्झॅक्शन फेल, या चुकांमुळे अडकतील तुमचेही पैसे -यानंतर Captcha सबमिट करा -याठिकाणी तुम्हाला अलॉटमेंटची संपूर्ण माहिती मिळेल -तुम्हाला शेअर मिळाला नसेल तर दोन दिवसात रिफंड मिळून जाईल BSE वेबसाइटवरुन तपासा अलॉटमेंट -सर्वात आधी https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx या लिंकला भेट द्या -यानंतर इक्विटीवर सिलेक्ट करा आणि ड्रॉपडाउन करा -झोमॅटो शेअरच्या नावावर क्लिक करा हे वाचा- चुकीच्या खात्यात ट्रान्सफर केली रक्कम? परत मिळवण्यासाठी काय आहे SBI चा सल्ला -याठिकाणी अॅप्लिकेशन क्रमांक, DP ID किंवा Client ID किंवा PAN प्रविष्ट करा -यानंतर सर्च बटनवर क्लिक करा -सर्व तपशील भरल्यानंतर अॅप्लिकेशन स्टेटस मिळेल नाही मिळाले शेअर्स तर कधीपर्यंत येईल रिफंड आज शेअर्सचे अलॉटमेंट झाले आहे. जर तुमच्या खात्यात शेअर्स आले नाहीत तर 23 जुलैपर्यंत तुमचे पैसे फ्रीजमधून हटवले जातील. दोन दिवसांमध्ये तुम्हाल पैसे रिफंड होतील. अलॉटमेंटनंतर तुम्हाला शेअर मिळाले आहेत तर तुमच्या डीमॅट खात्यात ते 26 जुलै रोजी दिसतील. झोमॅटोच्या शेअर्सचे लिस्टिंग 27 तारखेला होणार आहे