करबचत- LIC च्या या नव्या विमा योजनेत आपण करबचत करू शकतो. याबरोबरच आपण कर्जही काढू शकतो.
मुंबई, 13 मे : अनेकदा लोक LICची पाॅलिसी खरेदी केल्यावर खूश होत नाहीत. पाॅलिसी घेतल्यानंतर आपण उगाच ही पाॅलिसी घेतली असं त्यांना वाटत राहतं. पण तुम्हाला हे माहीत आहे का, की पाॅलिसी घेतल्यानंतर तुम्ही ते पैसे परत घेऊ शकता. हा आहे फ्री लुक पीरियड. याचा फायदा तुम्ही 15 दिवसांमध्ये घेऊ शकता. या काळात तुम्ही पाॅलिसी परत करू शकता. या पाॅलिसींवर असतो फ्री लुक पीरियड फ्री लुक पीरियड हा कमीत कमी 3 वर्षाची जीवन विमा पाॅलिसी किंवा स्वास्थ्य विमा पाॅलिसीवर लागू होते. तुम्ही पाॅलिसीचे कागद मिळाल्यानंतर 15 दिवसांच्या आत याचा उपयोग करू शकता. SBI चं खास सेव्हिंग अकाउंट उघडलंत तर मिळतील ‘या’ सुविधा कंपनीद्वारे पाॅलिसी रद्द करा तुम्ही पाॅलिसी रद्द करण्याचा निर्णय घेतलात तर फक्त एजंटला सांगून काम होणार नाही. एटंज यात उशीर करू शकतो. म्हणून तुम्ही सरळ कंपनीशीच संपर्क साधा. तुम्हाला पाॅलिसी रद्द करण्याचा अर्ज करावा लागेल. अनेक कंपनी वेबसाइटवर कॅन्सलेशनचा फाॅर्म अपलोड करतात. तो तुम्ही डाऊनलोड करा. खिशात पैसे नसले तरीही जा फिरायला देश-विदेशात, ‘या’ बँका करतायत मदत युलिपचा मामला युनिट लिंक्ड इन्शुरन्स पाॅलिसी ( युलिप ) या पीरियडमध्ये रद्द करण्याचा निर्णय घेतला जातो, तेव्हा युनिट रद्द करण्याचा खर्च कापून घेतला जातो. मोठ्या अपघातातून सनी देओल बचावले; तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या प्रीमियम पूर्ण मिळण्याची अपेक्षा ठेवू नका प्रीमियम पूर्ण भरणार नाही. कंपनी मेडिकल टेस्ट आणि स्टँप ड्युटीचा खर्च घेते. पण फ्री लुक पीरियडचा तेवढा तोटा होऊन बाकी पाॅलिसीचे पैसे वाचतात. बीड जिल्ह्याच्या दुष्काळ दौऱ्यात काय म्हणाले शरद पवार? पाहा हा VIDEO