JOIN US
मराठी बातम्या / मनी / विजया दशमीच्या मुहूर्तावर सोन्याचा भाव वाढला; गेल्या दहा वर्षांतला सर्वांत महागडा दसरा

विजया दशमीच्या मुहूर्तावर सोन्याचा भाव वाढला; गेल्या दहा वर्षांतला सर्वांत महागडा दसरा

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याची मागणी वाढल्यामुळे दरातही थोडी वाढ झाली आहे. काय आहे आजचा भाव? 10 वर्षांत सोनं कसं झळाळलं पाहा…

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 ऑक्टोबर : दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याची मागणी वाढल्यामुळे दरातही थोडी वाढ झाली आहे. पण गेल्या दहा वर्षांतला सोन्याचा चढता भाव बघता या वर्षभरात झालेली दरवाढ विक्रमी आहे. सराफा बाजारात आजचा सोन्याचा भाव प्रति तोळा 39300 ( GST सह )आहे. कालच्यापेक्षा हा दर वाढलेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे दर 1 हजार 503 डॉलर प्रतिऔंस झाले तर चांदीचा दर 17. 47 डॉलर प्रतिऔंस आहे. 2010 साली 18000 ते 19000 च्या दरम्यान असलेला सोन्याचा दर आता 2019 मध्ये 40 हजारांच्या जवळ पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या दसऱ्याला सोन्याचा दर 31 हजार 912 होता. तो आता 39 हजार 300 झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढलेल्या किमती, अमेरिका - चीन ट्रेड वॉर, भारतीय रुपयाचं गडगडलेलं मूल्य, जागतिक मंदीसदृश परिस्थिती अशी अनेक कारणं सोन्याच्या भाववाढीमागे आहेत. संबंधित - सरकार देतंय सोनं खरेदी करण्याची ‘सुवर्णसंधी’! हे मिळणार फायदे दसरा किंवा विजया दशमी हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी आवर्जून सुवर्ण खरेदी केली जाते. वाचा - Google वर या 8 गोष्टी चुकूनही Search करू नका; होईल मोठं नुकसान त्यामुळे आजची दसऱ्याची भाववाढ ही स्थानिक बाजारातल्या वाढलेल्या मागणीमुळे झाली आहे. सोमवारी सोन्याच्या मागणीत घट झाल्याने दर कमी झाले होते. गेल्या 10 वर्षांत सोनं असं झळाळलं दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी होते. त्यामुळे त्या वर्षातला दसऱ्याच्या दिवशीचा दर महत्त्वाचा ठरतो. 2010 साली दसऱ्याच्या दिवशी सोन्याचा दर होता 19हजार 820 आणि आजचा दर आहे 39 हजार 300. 2015 नंतर असाच सोन्याचा दर मोठ्या प्रमाणावर वाढला होता. आदल्या वर्षी 26 हजार 862   असलेला दर 2016 च्या दसऱ्याला 29 हजार 678 वर पोहोचला. गेल्या वर्षीच्या दसऱ्याला सोन्याचा दर 31 हजार 912 होता. तो आता 39 हजार 300 झाला आहे. 08 ऑक्टोबर 2019 - 39300 19 ऑक्टोबर 2018 - 31912 30 सप्टेंबर 2017 - 29557 11 ऑक्टोबर 2016 - 29678 22 ऑक्टोबर 2015 - 26862 03 ऑक्टोबर 2014 - 26559 13 ऑक्टोबर 2013 - 28350 24 ऑक्टोबर 2012 - 30854 6 ऑक्टोबर 2011 - 26510 17 ऑक्टोबर 2010 - 19820 वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे भाव तुम्ही सराफाकडून जे सोनं खरेदी करता त्याच्या किंमती स्पॉट प्राइस या न्यायाने ठरतात. बहुतांश शहरात सराफांच्या संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याच्या वेळी सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात. संबंधित बातम्या सोन्याच्या दागिन्यांबद्दल सरकारचा मोठा निर्णय, खरेदी करण्यापूर्वी वाचा नियम वाचा - साईबाबांच्या शिर्डीत काय आहे विजयादशमीचं महत्त्व? वाचा सविस्तर… RBI चा मोठा निर्णय; ATMमधून नाही निघणार 2000 रुपयांची नोट, कारण…!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या