नवी दिल्ली, 05 ऑक्टोबर : सोन्याच्या दागिण्यांबद्दल केंद्र सरकारने मोठा नियम बदलण्याची तयारी केली आहे. याचा सराफ बाजारावर परिणाम होणार असून ग्राहकांना फायदा होणार आहे. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी शुक्रवारी सांगितलं की, सोन्याच्या दागिण्यांवर बीआयएस ह़ॉलमार्किंग बंधनकारक करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. आता जागतिक व्यापारी संघटनेला याची माहिती दिल्यानंतर हा नियम लागू करण्यात येईल. सध्या देशभरात 800 हॉलमार्किंग केंद्र आहेत. यामध्ये फक्त 40 टक्के दागिण्यांनाच हॉलमार्क केलं जातं. जगात सर्वाधिक सोन्याची आयत भारतात केली जाते. देशात दरवर्षी 700 ते 800 टन सोनं आयात करतात. जागतिक व्यापारी संघटनेच्या नियमांनुसार हॉलमार्क बंधनकारक करण्याची माहिती त्यांना द्यावी लागते. या प्रक्रियेला किमान दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. हॉलमार्किंगमुळे दागिण्यांची शुद्धता समजते. WTO कडून मंजूरी मिळाल्यानंतर हॉलमार्क बंधनकारक करण्यात येणार आहे. मंत्रालयाअंतर्गत बीआयएसकडे हॉलमार्किंगचे अधिकार आहेत. यामध्ये 14 कॅरेट, 18 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्यासाठी हॉलमार्किंग निश्चित कऱण्यात आलं आहे. याचा लाभ ग्राहकांना मिळणार आहे. सध्या देशात ग्राहकांच्या इच्छेनुसार हॉलमार्क दागिणे दिले जातात. नियम लागू झाल्यानंतर सराफांना हॉलमार्क असलेले दागिणे विकणं बंधनकारक असेल. त्यामुळे दागिण्यांच्या शुद्धतेमध्ये केली जाणारी फसवणूक थांबणार आहे. VIDEO: मोजत बसा! उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घेऊन आला 10 रुपयांचे चिल्लर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







