साईबाबांच्या शिर्डीत काय आहे विजयादशमीचं महत्त्व? वाचा सविस्तर...

साईबाबांच्या शिर्डीत काय आहे विजयादशमीचं महत्त्व? वाचा सविस्तर...

शिर्डीत वर्षभरात मुख्य तीन उत्सव साजरे केले जातात. गुढीपाडवा, रामनवमी आणि विजयादशमी.

  • Share this:

हरिष दिमोटे, प्रतिनिधी

शिर्डी, 08 ऑक्टोबर : आज दसरा आहे. अर्थात विजयादशमी. वाईटावर चांगल्याची मात होते याचं प्रतिक म्हणजे हा दसरा. आजच्याच दिवशी रामानं रावणाचं दहन केलं होतं. आणि महाभारतातही आजच्याच दिवशी पांडवांनी आपली शस्त्र शमीच्या झाडातून पुन्हा बाहेर काढली होती असं मानलं जातं. त्यामुळे आज शस्त्रपूजनही केलं जातं. आज देशभरात दसऱ्याचा जल्लोष असून साईबाबांचा 101वा पुण्यतीथी सोहळा आज शिर्डीत साजरा होत आहे. चार दिवस चालणा-या विजयादशमी उत्सवाला सोमवारपासून सुरूवात झाली. आज उत्सवाचा दुसरा मुख्य दिवस आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी हजारो भाविक येणार असल्याने साईमंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलं होतं.

विजयादशमीच्या दिवशी 1918 साली साईबाबांनी आपला देह सोडला होता तेव्हापासून दरवर्षी पुण्यतीथी उत्सव साजरा करण्यात येतो. शिर्डीत वर्षभरात मुख्य तीन उत्सव साजरे केले जातात. गुढीपाडवा, रामनवमी आणि विजयादशमी. या तीनही उत्सवात साईभक्तांची मोठी गर्दी शिर्डीत असते. आजही हजारो भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत तर साईमंदिर आकर्षक फुलांनी आणि सुंदर विद्यूतरोषणाईने सजलं आहे.

मुंबईतील द्वारकामाई भक्त मंडळाने साईमंदिर परीसरात उभारलेले सुंदर प्रवेशद्वार सर्वांचे लक्ष वेधून घेतात. आज पहाटे काकड आरतीने उत्सवाच्या मुख्य दिवसाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली असून साईबाबांचा आराधना विधी, भिक्षा झोळी यासह विविध कार्यक्रमांची रेलचेल आज शिर्डीत असणार आहे. बाबांच्या दर्शनासाठी हजारो भाविक शिर्डीत येत असल्याने सर्वांना बाबांचे आज दर्शन घेता यावे यासाठी साईमंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले राहणार आहे.

विजयादशमीनिमित्त विठ्ठल रूक्मिणीला झेंडूच्या फुलांची आरास

नवरात्रोत्सव आणि विजयादशमी निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीला पिवळ्या झेंडूच्या फुलांची आरास करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दररोज नऊ दिवस विठ्ठल रूक्मिणीची विविध रूपांत पूजा केली जाते. विजयादशमीनिमित्त समितीच्या वतीने हजारो पिवळ्या झेंडूच्या फुलांचा वापर करून विठ्ठल रुक्मिणी गाभारा, सोळखांबी, परिवार देवता मंदिर सजवली आहे. झेंडूच्या फुलांच्या आकर्षक सजावटीमुळे मंदिरातील वातावरण आनंदायी बनलं आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या विजयादशमी निमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.

विजयादशमीच्या दिवशी शस्त्राची पूजा

पांडव काळात, महाभारतात, आधुनिक काळात आणि पौराणिक काळात समोल्लंघनाचा विषय जोडला जातो. श्रीरामाने रावणाचा वध केला आणि म्हणून रावण दहन होतं. रावण वध करून प्रभू रामचंद्र अयोध्येला परत आले तो दिवस पाडवांचा. म्हणजे रावणाचा वध केल्यापासून अयोध्येला येईपर्यंत प्रभू रामचंद्रांना सहा महिने लागले. त्या काळात कोणत्याच सुख-सुविधा नव्हत्या. म्हणून त्यानुसार विषय हातळले गेले.

विजयादशमीच्या दिवशी पांडवांनी आपली शस्त्रे शमी झाडाच्या ढोलीतून बाहेर काढली आणि ते युद्धासाठी सज्ज झाले. म्हणून विजयादशमीच्या दिवशी शस्त्राची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली. सीमोल्लंघनाचा अर्थ पांडव काळातील शस्त्र हाती घेऊन बाहेर पडण्याचा नसून आजच्या समाज जीवनातील विस्कटलेल्या चौकटी पुन्हा सांधण्याचा दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आणि पांडवांच्या काळाला साजेस असंच काहीसं सिमोल्लंघन सध्या राज्यात दिसत आहे.

First published: October 8, 2019, 9:53 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading