JOIN US
मराठी बातम्या / मनी / Life Insurance वर कर आकारला जातो का? काय सांगतो नियम

Life Insurance वर कर आकारला जातो का? काय सांगतो नियम

जीवन विमा हा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याचा एक मार्ग आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : बऱ्याचदा लाईफ इंश्युरन्स पॉलिसीवर टॅक्स लागत नाही असं सांगितलं जातं. लाइफ इन्शुरन्स पॉलिसी ही व्यक्ती आणि विमा कंपनी यांच्यातील करार असतो. विमा काढलेल्याच्या मृत्यूनंतर किंवा पॉलिसीच्या मुदतपूर्तीवर, कंपनी त्याला किंवा त्याच्या कुटुंबाला ठरावीक रक्कम देते. जीवन विमा हा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याचा एक मार्ग आहे. केवळ कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करणं एवढंच नाही तर टॅकमधून देखील याला सूट मिळते. मात्र या पॉलिसीवर टॅक्स असतो का असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? याचा थेट संबंध आयकर कायद्याचे 2 कलम आहेत ज्यांच्या आधारे टॅक्स कापला जातो. एक 80C आणि दुसरा 10D आहे. किती मिळते आयकरातून सूट? तुम्ही वर्षभरात लाइफ इन्शुरन्ससाठी रु. 1.50 लाखांपर्यंतच टॅक्सवर सूट मिळवू शकता. तुमचा प्रीमियम सम एश्योर्ड (मॅच्युरिटीवेळी मिळणारी रक्कम) 10% पेक्षा जास्त नसावा. जर तो टक्केवारीपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला करातून सूट मिळत नाही. अपंग लोकांसाठी आणि कोणत्याही जीवघेण्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी 15 टक्के सूट आहे. सेक्शन 10 काय सांगतो? तुमच्या विमाच्या मॅच्युरिटीवर टॅक्स लागणार की नाही हे या कलमामध्ये सांगण्यात आलं आहे. डेथ बेनिफिट, मेच्युरिटी किंवा इतर बोनसवर टॅक्स लागू होतो. मात्र विमा काढणाऱ्याच्या मृत्यूनंतर मिळालेल्या रकमेवर टॅक्स लागत नाही. तुम्हाला मॅच्युरिटीतून मिळालेल्या लाभांवर पैसे द्यावे लागतील.

ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारकडून आनंदाची बातमी, लवकरच सुरू होणार ‘ही’ सेवा

ते तुमच्या प्रीमियमवर अवलंबून असेल. 1 एप्रिल 2012 नंतर घेतलेल्या विमा पॉलिसीमध्ये, जर तुमचा प्रीमियम मॅच्युरिटी रकमेच्या 10% पेक्षा जास्त असेल, तर मॅच्युरिटी रक्कम करपात्र असेल. हा कर तुमच्या आयकर स्लॅबच्या आधारे लागू होईल. त्याच वेळी, 2003-2012 दरम्यान घेतलेल्या पॉलिसींसाठी ही मर्यादा 20 टक्के आहे. यूलिप प्रकरणात नियम काय सांगतो? तुमच्या प्रीमियमची रक्कम वार्षिक आधारावर रु. 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास युनिट लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसी (ULIPs) तुमच्यावर देखील कर आकारला जाऊ शकतो. ULIP ही पॉलिसी आहेत जिथे तुम्ही फक्त काही वर्षांसाठी प्रीमियम भरता आणि विमा कंपनी ते पैसे शेअर बाजारात पैसे गुंतवून त्यानुसार मिळालेल्या फायद्यावर तुम्हाला परतावा देते.

EPFO updates : तुमचा UAN नंबर कशा शोधायचा, तो Activate कसा करायचा?

संबंधित बातम्या

युलिपमधील गुंतवणूक साधारणपणे 5 वर्षांसाठी असते. ही गुंतवणूक एकाच वेळी वर्षभर करता येते. यामध्ये तुम्हाला मार्केट लिंक्ड रिटर्नसह मॅच्युरिटीवर पैसे मिळतात. त्याच वेळी, व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला साधारण 10 लाखापर्यंत रक्कम मिळू शकते हा आकडा निश्चित नसतो. तो बदलण्याची शक्यता असते. यामध्ये जोखमीही अधिक असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या