नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर: देशातील सर्वात मोठी स्टील कंपनी टाटा स्टील (Tata Steel) त्यांच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. कंपनी लवकरच कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम एनीवेअर’ (Work From Anywhere) अर्थात कुठुनही काम करण्याची पॉलिसी लाँच करणार आहे. या पॉलिसीअंतर्गत जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसून कंपनीचे कर्मचारी काम करू शकतात. कंपनीने अशी माहिती दिली आहे की, कोरोना काळ संपल्यानंतर देखील कंपनीकडून ही पॉलिसी सुरू ठेवण्यात येणार आहे. सुरुवातीला केवळ 10 टक्के कर्मचाऱ्यांना ही सुविधा दिली जाणार आहे. त्यानंतर या उपक्रमानंतर मिळालेला रिझल्ट पाहून 30 टक्के कर्मचाऱ्यांना ही सुविधा देण्याचा विचार कंपनी करत आहे. या पॉलिसीमुळे रिअल इस्टेटवर होणाऱ्या खर्चात मोठी बचत होऊ शकते. कंपनीच्या इतर व्हाइट कॉलर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मर्यादित सुविधा मिळेल. इकॉनॉमिक्स टाइम्समधील वृत्तानुसार याच महिन्यापासून म्हणजेच नोव्हेंबरपासून ही पॉलिसी लागू केली जाऊ शकते. देशभरात टाटा स्टीलचे साधारण 32,000 स्थायी आणि 55,000 हजार अस्थायी कर्मचारी कार्यरत आहेत. (हे वाचा- LPG Cylinder: मोबाइल क्रमांक लिंक नसला तरीही मिळेल घरगुती गॅस सिलेंडर?) टाटा स्टीलचे एचआर व्हाइस प्रेसिडेंट एएस सान्याल यांच्या मते, सुरुवातीच्या काळात एखाद्या कर्मचाऱ्याचे कार्यालयामध्ये उपस्थित असणे आवश्यक होते, पण कोरोना काळात हा ट्रेंड बदलला आहे. त्यांनी अशी माहिती दिली की, सुरुवातीच्या काळात आयटी सपोर्ट, डिजिटल मार्केटिंग, स्ट्रॅटेजी अँड प्लॅनिंग, प्रोक्योरमेंट, क्वालिटी मॅनेजमेंट, सेल्स आणि एच आर या डिपार्टमेंटमधील कर्मचारी वर्क फ्रॉम एनीवेअर पॉलिसीमध्ये येतील. (हे वाचा- एकीकडे किंमत कमी तर दुसरीकडे रडवतोय कांदा! वाचा कुठे आहे 35 रुपये किलो एवढा दर ) त्याचबरोबर त्यांनी अशी माहिती दिली की, विश्वासाच्या आधारावर ही पॉलिसी चालेल. तसंच वर्षभरासाठी या पॉलिसीचा लर्निंग पीरिएड असेल. त्यानंतर कंपनी स्ट्रक्चर आणि काम करण्याची क्षमता यासारख्या विषयांवर विचार केला जाईल. यामध्ये कसे काम होत आहे, हे देखील तपासले जाईल. मायक्रोसॉफ्टमध्ये लागू आहे ही पॉलिसी दिग्गज सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टने देखील वर्क फ्रॉम होम पॉलिसीचा विस्तार केला आहे. अनेक कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम स्थायी करण्यात आले आहे. कंपनीने याकरता हायब्रिड वर्क प्लेस गाइडलाइन्स जारी केल्या आहे. त्यामध्ये कर्मचारी फ्लेक्झिबल रिमोट वर्क शेड्यूल कसे निश्चित केले जाइल हे सांगितले आहे. त्याचप्रमाणे कर्मचारी देशभरात कुठेही लोकेशन बदलू शकतात.