याशिवाय एसबीआयने १ डिसेंबरपासून पेंशन लोन आणि पर्सनल लोनवर प्रोसेसिंग फी घ्यायला सुरूवात केली आहे. बँकेने खास फेस्टिवल ऑफरसाठी प्रोसेसिंग फीमध्ये सूट दिली होती.
नवी दिल्ली, 14 मार्च : देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI-State Bank of India) त्यांच्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. एसबीआयने बचत खात्यावरील (Saving Bank Account)व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने जारी केलेल्या निवेदनानुसार खात्यामध्ये जमा असलेल्या एक लाख रुपयांपर्यंत आता 0.25 टक्के कमी व्याज मिळणार आहे. एसबीआयच्या या निर्णयामुळे 40 कोटी ग्राहकांवर मोठा परिणाम होणार आहे. (हे वाचा- सुवर्णसंधी! 1,097 रुपयांनी घसरले सोन्याचे दर, शुक्रवारचे भाव इथे पाहा ) एसबीआयने बचत खात्यामध्ये असणाऱ्या रकमेवर मिळणारा वार्षिक व्याजदर कमी करत तो 3 टक्क्यांवर आणला आहे. व्याजदराबाबत SBI चा मोठा निर्णय एसबीआयने बचत खात्यामध्ये असणाऱ्या रकमेवर मिळणारा वार्षिक व्याजदर कमी करत तो 3 टक्के केला आहे. याआधी 1 लाख रुपयांपर्यंत वार्षिक 3.25 टक्के व्याजदर तर 1 लाखांपेक्षा जास्त रक्कम बचत खात्यामध्ये असल्या वार्षिक व्याजदर 3 टक्के होता. गेल्या आठवड्यात FD च्या व्याजदरामध्ये झाली होती घट एकीकडे देशात कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असताना SBI ने फिक्स्ड डिपॉझिटच्या (FD) व्याजदरात कपात केली होती. महिन्याभरात भारतीय स्टेट बँकेने दुसऱ्यांदा व्याजदरात कपात केल्यामुळे SBI ग्राहकांमध्ये नाराजी पसरली होती. आता पुन्हा एसबीआयने बचत खात्यावरील (Saving Bank Account) व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. (हे वाचा- येस बँकेच्या पुनर्रचनेसाठी कॅबिनेटची मंजूरी, SBI करणार 7,250 कोटींची गुंतवणूक) (SBI)च्या नव्या व्याजदरानुसार बँकेने शॉर्ट टर्म अर्थात 45 दिवसांच्या FD वर 0.50 टक्के कपात केली आहेत. हा नियम 10 मार्चपासून लागू करण्यता आलेला आहे. दरम्यान नव्या व्याजदरानुसार 7 ते 45 दिवसांच्या मुदत ठेवीवर (FD) वर 4 टक्के व्याज मिळणार आहे. यापूर्वी ते 4.50 टक्के इतकं होतं. याबरोबरच 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठीच्या FD वर व्याजदारामध्ये 0.10 टक्क्याने घट झाली आहे. या रकमेवर पूर्वी 6 टक्क्यांपर्यंत व्याज मिळत होतं.