मुंबई: अमेरिकेच्या US फेडने महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी ०.७५ टक्के व्याजदरात वाढ केली. त्यानंतर गेले दोन आठवडे शेअर मार्केटमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. २ आठवडे शेअर मार्केट कोसळल्याचं पाहाला मिळालं. भारतात सलग दुसऱ्या आठवड्यात सेन्सेक्स ७४२ तर निफ्टी ५० अंकांनी कोसळली. ऑटो आणि एफएमजीसी सेक्टर सोडल्यास इतर क्षेत्रांवर दबाव असल्याचं पाहायला मिळालं. तुम्ही जर या आठवड्यात स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात मार्केटची स्थिती कशी असेल याबाबत जाणून घेऊया. १० गोष्टींवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. त्यातून तुम्हाला मार्केटचा मूड कसा असेल याचा अंदाज येऊ शकतो. त्यानुसार तुम्ही गुंतवणूक करू शकता. RBI चा रेपो रेटबाबत निर्णय RBI रेपो रेटबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे EMIचे व्याजदर वाढू शकतं. BPS मध्ये ०.५० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. MPC मध्ये देखल वाढ होऊ शकते. याचा मार्केटवर कसा परिणाम होऊ शकतो ते पाहावं लागणार आहे.
Share Market : नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर ‘या’ स्टॉकमध्ये पैसे गुंतवून मिळवू शकता मोठा फायदाबँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस यांच्या मते, महागाई ७ टक्क्यांच्या उच्चांकावर आहे आणि ती लवकरच कमी होण्याची चिन्हे नाहीत. अशा परिस्थितीत दर वाढण्याची शक्यता खूप जास्त आहे. रुपया सलग आठव्या दिवशी शुक्रवारी कमजोर झाला आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 80.99 रुपयांवर बंद झाला. डॉलरची मजबूती, युक्रेन आणि रशियामधील वाढता तणाव, यूएस फेड आणि बँक ऑफ इंग्लंडसह काही केंद्रीय बँकांचे कठोर आक्रमक धोरण आणि देशांतर्गत इक्विटी बाजारातील कमजोरी यामुळे रुपयावर दबाव वाढू शकतो. डॉलरची किंमत वाढली गेल्या दीड महिन्यात डॉलरचं मूल्य ७ टक्क्यांनी वाढलं आहे. २००२ मध्ये सगळ्या जास्त मूल्य होतं. त्यानंतर पुन्हा एकदा डॉलरचं मूल्य वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवरही त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे.
ही एक सिक्रेट Scheme 25 वर्षात तुम्हाला करणार करोडपती, टॅक्समधूनही मिळतेय सूटमागच्या आठवड्यात FII सलग दुसऱ्या आठवड्यात खरेदीपेक्षा जास्त विक्री केली. मजबूत डॉलर आणि यूएस बॉण्ड उत्पन्नात वाढ झाली आहे. जर यूएस डॉलर इंडेक्स आणि 10 वर्षांचे ट्रेझरी यिल्ड बाँड मजबूत राहिल्यास, तज्ज्ञांना एफपीआय (परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार) कडून विक्रीची अपेक्षा आहे. अमेरिकेच्या जून तिमाही आकड्यांकडे लक्ष असणार आहे. यूरो एरियामध्ये पुढच्या आठवड्यात ऑगस्टचे रोजगार आकडे येतील याचे परिणामही शेअर मार्केटमध्ये होताना दिसू शकतात. जपानमध्ये ऑगस्ट महिन्यातील इकनॉमिक आकडे जारी करण्यात येणार आहेत. तेलाच्या किंमती मजबूत डॉलर आणि मंदीच्या भीतीने गेल्या आठवड्यात तेलाच्या किमतीमध्ये चढ-उतार होत असल्याचं दिसलं. शुक्रवारी तेलाच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली. जी जानेवारीपासून सर्वात मोठी घसरण असल्याचं सांगितलं जातं. तज्ज्ञांच्या मते, तेलाच्या किमती आणखी घसरल्यास, ते RBI च्या आर्थिक धोरणांना समर्थन देईल कारण भारतात कच्च्या तेलाची मागणी जास्त आहे.
LIC Policy Aadhaar Shila: रोज गुंतवा 29 रुपये आणि मॅच्युरिटीपर्यंत मिळवा 4 लाखयेत्या काही दिवसांत तो शेअर मार्केट आणखी खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता घेतलेला शेअर काढण्याची गडबड करू नका. एचडीएफसी सिक्युरिटीजचे तांत्रिक संशोधन विश्लेषक नागराज शेट्टी यांच्या मते, सध्याच्या कमकुवतपणामुळे निफ्टी नजीकच्या काळात १७०००-१६९०० च्या पातळीवर घसरेल. हर्षा इंजीनियर्स इंटरनेशनलचा आयपीओ आज लिस्ट होणार आहे. यासाठी चांगला रिस्पॉन्स देखील मिळाला आहे. ५० टक्के अधिक प्रीमियम लिस्टिंग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ऑगस्ट महिन्यातील वित्तीय तूट आणि पायाभूत उत्पादनाची आकडेवारी पुढील आठवड्यात येईल. याशिवाय सप्टेंबरमधील विक्रीचे आकडेही येतील त्यामुळे ऑटो शेअरवर लक्ष केंद्रित केलं जाईल. कॉर्पोरेट बाजूने, पोंडी ऑक्साइज अॅण्ड केमिकल्स आणि राम रत्न वायर्स एक्स-बोनस ट्रेडिंग सुरू करतील.