मुंबई : US फेडने व्याजदर वाढवल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसह भारतातील शेअर मार्केटवर मोठा परिणाम झाला आहे. सलग तिसऱ्या दिवशी शेअर मार्केट मोठ्या अंकांनी उघडताच कोसळलं. त्यामुळे मोठी निराशा झाली आहे. मार्केट उघडताच सेन्सेक्स 600 अंकांनी घसरला, निफ्टी 17,200 च्या खाली उघडला, रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर असल्याने त्याचे परिणाम शेअर बाजारात दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरातही मोठी घसरण होत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी पडझड झालीय. बाजार सुरू होताच मुंबई शेअर बाजार 750 अंकानी घसरलाय. तर निफ्टीही 250 अंकांनी खाली आला.
Share Market : नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर ‘या’ स्टॉकमध्ये पैसे गुंतवून मिळवू शकता मोठा फायदा
शेअर बाजारावर मंदीच्या शक्यतेचं सावट असल्याचं बोललं जातं आहे. फक्त बाजारच पडलाय असं नाही तर डॉलरच्या तुलनेत रुपयाचीही मोठी घसरण झाली असून रुपया 81.54 पर्यंत खाली घसरलाय. रुपयामध्ये 56 पैशांची घसरण झाली आहे. रुपया रोज रेकॉर्ड मोडत असून डॉलरचं मूल्य वाढत आहे. त्यामुळे अनेक गोष्टी महागण्याची शक्यता आहे.