JOIN US
मराठी बातम्या / मनी / SBI च्या या सूचनांकडे दूर्लक्ष करू नका! अन्यथा येईल कंगाल होण्याची वेळ

SBI च्या या सूचनांकडे दूर्लक्ष करू नका! अन्यथा येईल कंगाल होण्याची वेळ

देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांना एक महत्त्वाची सूचना दिली आहे. एसबीआयने (SBI) त्यांच्या ग्राहकांना फसवणुकीपासून वाचण्याचा, भामट्यांपासून सावध राहण्याचा आणि संवेदनशील माहिती ऑनलाइन शेअर न करण्याचा सल्ला दिला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 22 मे: देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) त्यांच्या ग्राहकांना एक महत्त्वाची सूचना दिली आहे. एसबीआयने (SBI) त्यांच्या ग्राहकांना फसवणुकीपासून वाचण्याचा, भामट्यांपासून सावध राहण्याचा आणि संवेदनशील माहिती ऑनलाइन शेअर न करण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय कोणत्याही अज्ञात सोअर्सवरून कोणतंही App डाऊनलोड न करण्याचा सल्ला देखील दिला आहे. एसबीआयच्या या सूचनांचं पालन न केल्यास तुमची फसवणूक होऊ शकते आणि तुमचं बँक खातं रिकामं केलं जाऊ शकतं. SBI ने केलं हे ट्वीट एसबीआयने केलेल्या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, आम्ही ग्राहकांना असा सल्ला देत आहोत की फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा आणि तुमची अतिसंवेदनशील माहिती ऑनलाइन शेअर करू नका किंवा एखादा अज्ञात स्रोत वापरून कोणतंही App डाऊनलोड करू नका.

संबंधित बातम्या

काय आहेत बँकेच्या सूचना? -तुमची माहिती जसं की जन्मतारीख, डेबिट कार्ड क्रमांक, इंटरनेट बँकिंग युजर आयडी/पासवर्ड, डेबिट कार्ड पिन, CVV, OTP इ. कुणासह शेअर करू नका -अशा भामट्यांपासून सावध राहा जे SBI, RBI, सरकार, ऑफिस, पोलीस, केवायसी अधिकारी इ. बनून तुमच्याशी संपर्क करतील - मोबाइल कॉल्स किंवा इमेल्सवर आधरित एखादा अज्ञात स्रोत वापरून कोणतंही App डाऊनलोड करू नका. हे वाचा- भारतीयांपेक्षा श्रीमंत झाले बांगलादेशी, 1.67 लाख रुपयांवर पोहोचलं दरडोई उत्पन्न -अज्ञात स्रोतावरून आलेल्या कोणत्याही मेलमधील अॅटचमेंटवर क्लिक करणं टाळा -हे आवश्यक आहे की तुम्ही मानक नियमांचे पालन केले पाहिजे आणि कोणच्याही अनोळखी व्यक्तीसह तुमची वैयक्तिक माहिती आणि बँकिंग तपशील शेअर करू नका

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या