नवी दिल्ली, 19 मे : देशात कोरोनाचा कहर वाढतोच आहे. यादरम्यान बँकिंग सेवा लोकांसाठी उपलब्ध आहेत. आता देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने (SBI-State Bnak of India) आपल्या सेवांमध्ये काही बदल केले आहेत. SBI ने बँक ब्राँच सुरू होण्याच्या आणि बंद होण्याच्या वेळेत बदल केले आहेत. त्याशिवाय बँक काही निवडक कामंच करणार असून सामान्य कामं आता होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. अतिशय आवश्यक असल्यासच बँकेत जा - ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनकडून दिलेल्या माहितीनुसार, बँक ग्राहकांनी अतिशय आवश्यक, गरजेच्या असलेल्या कामांसाठीच ब्राँचमध्ये यावं. तसंच 31 मेपर्यंत सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंतच ब्राँचमध्ये पोहोचावं. बँक शाखा 2 वाजेपर्यंत बंद होणार आहे. बँक सुरू होण्याची वेळ - SBI ब्राँच आता सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 2 पर्यंतच सुरू राहणार आहे. तसंच नव्या नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेचं प्रशासकीय कार्यालय 50 टक्के स्टाफ सदस्यांसह पूर्वीप्रमाणे बँकिंग तासात कार्यरत राहतील.
मास्क - बँक शाखेत जाणाऱ्या ग्राहकांना मास्क लावणं अनिवार्य आहे, अन्यथा त्यांनी बँकेत प्रवेश दिला जाणार नाही. तसंच एसबीआयकडून ट्विटरवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, बँकेत जाऊन आता केवळ चारच कामं केली जातील. - कॅश जमा करणं किंवा काढणं. - चेकसंबंधी कामं - डीडी अर्थात डिमांड ड्राफ्ट/RTGS/NEFT संबंधीत कामं - गव्हर्मेंट चालान बँक फोन सर्विस - SBI फोन बँकिंगसाठी आधी रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यानंतर पासवर्ड बनवावा लागतो. त्यानंतर ग्राहक संपर्क केंद्राच्या माध्यमातून फोन सर्विसचा फायदा घेऊ शकतात.