JOIN US
मराठी बातम्या / मनी / ना फाटणार, ना भिजणार; लवकरच तुमच्या खिशात असणार 100 रुपयाची नवी नोट

ना फाटणार, ना भिजणार; लवकरच तुमच्या खिशात असणार 100 रुपयाची नवी नोट

फिल्ड ट्रायल यशस्वी झाल्यानंतर varnish-coating नोटा बाजारात येतील आणि जुन्या नोटा हळू-हळू सिस्टममधून बाहेर केल्या जातील. ही माहिती रिझर्व्ह बँकेने आपल्या वार्षिक रिपोर्टमध्ये दिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 29 मे : लवकरचं तुमच्या खिशात 100 रुपयाची चमचमती नोट येणार आहे. 100 रुपयांची (New Rs 100 note) ही नवी नोट ना फाटणार, ना भिजणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 100 रुपयांची Varnish Note आणण्याच्या तयारीत आहे. आरबीआय अशा 1 अब्ज नोटा छापत आहे. नोटा टिकाऊ आणि सुरक्षित होणं, हे Varnish Note (varnish-coating of new Rs 100 note) आणण्यामागे कारण असल्याचं सांगितलं आहे. सध्या या नोटा ट्रायल आधारे जारी केल्या जातील. त्यानंतर, फिल्ड ट्रायल यशस्वी झाल्यानंतर varnish-coating नोटा बाजारात येतील आणि जुन्या नोटा हळू-हळू सिस्टममधून बाहेर केल्या जातील. ही माहिती रिझर्व्ह बँकेने आपल्या वार्षिक रिपोर्टमध्ये दिली आहे. सध्या बाजारात जांभळ्या रंगाची 100 रुपयांची नोट वापरात आहे. RBI आता varnish-coating असलेल्या 100 रुपयांच्या नोटा आणणार आहे. ही नोट जांभळ्याच रंगाची असेल. नव्या नोटेची विशेष बाब म्हणजे, ही नोट कोणत्याही प्रकारे खराब होणार नाही. कितीही वेळा मोडली तरी ही नोट फाटणार नाही. 100 रुपयांच्या या नव्या नोटेवर पाण्याचाही फरक पडणार नाही, कारणं या नोटांवर वार्निश पेंट असेल. लाकडावर उपयोग केला जाणारा वार्निश पेंट यावर वापरला जाणार आहे. नव्या नोटेचं डिझाईन, सध्याच्या नोटेप्रमाणेच असणार आहे. सध्याच्या नोटा लवकर फाटतात, खराबही होतात. आताच्या नोटेपेक्षा वार्निश नोट दुप्पट टिकाऊ असणार आहे. सध्याच्या 100 रुपयांच्या नोटेचं सरासरी वय अडीच ते साडे तीन वर्ष आहे. परंतु वार्निश नोटेचं वय जवळपास 7 वर्षांपर्यंत असेल, असं सांगण्यात आलं आहे.

(वाचा -  कोणी दुसरा व्यक्ती तुमच्या Aadhaar Card चा वापर तर करत नाही ना? असं ओळखा )

RBI Report

(वाचा -  …तर टोल प्लाझावर Toll भरू नका; मोदी सरकारचा वाहनधारकांना मोठा दिलासा )

केंद्र सरकारने आधीच भारतीय रिझर्व्ह बँकेला 100 रुपयांच्या 1 अब्ज वार्निश नोटा छापण्याची मंजुरी दिली आहे. मागील वर्षी वित्त राज्य मंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात राज्यसभेत याबाबत माहिती दिली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या