नवी दिल्ली, 08 जून: पंजाब नॅशनल बँक (PNB Punjab National Bank) आणि बँक ऑफ इंडियाच्या (BoI Bank of India) ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) या दोन बँकांवर 6 कोटींचा दंड ठोठावला आहे. आरबीआयच्या निकषांचे उल्लंघन केल्यामुळे या बँकांवर हा दंड आकारण्यात आला आहे. यापैकी एक उल्लंघन वर्गीकरणाच्या नियमांशी आणि फसवणूकीच्या रिपोर्टिंगशी संबंधित आहे. बँक ऑफ इंडियाला 4 कोटी आणि पंजाब नॅशनल बँकेला 2 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयने एका निवेदनात असं म्हटलं आहे की, बँक ऑफ इंडियाच्या इन्स्पेक्शन ऑफ सुपरवायजर इव्हॅल्यूएशन (ISE) साठी 31 मार्च 2019 रोजी वैधानिक तपासणी केली गेली. बँकेने एका खात्यात फसवणूक झाल्याची समीक्षा केली होती आणि त्याच रिपोर्ट (FMR) सोपवण्यात आला आहे. हे वाचा- खूशखबर! मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना वार्षिक मिळतील 42000, वाचा कसा होईल फायदा रिपोर्टमध्ये झाला खुलासा आरबीआयने आणखी एका निवेदनात असं म्हटलं आहे की, आर्थिक स्थिती संदर्भात पंजाब नॅशनल बँकेची वैधानिक तपासणी केली गेली. केंद्रीय बँकेने असं म्हटलं की जोखीम मुल्यांकन अहवालाच्या तपासणीनंतर आरबीआयच्या निकषांचे उल्लंघन झाल्याचं समोर आलं आहे. बँकांना कारणे दाखवा नोटीस या दोन्ही प्रकरणात या सरकारी बँकांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. ज्यामध्ये या बँकाना दंड का आकारू नये यासंदर्भात कारण विचारण्यात आलं आहे. आरबीआयच्या मते नियामक पालन न केल्यामुळे दोन्ही बँकांना दंड ठोठावण्यात आला आहे. हे वाचा- निवृत्तीपूर्वी PF मधून पैसे काढत असाल तर सावधान; होऊ शकतं नुकसान याआधी या बँकांना ठोठालला आहे दंड यापूर्वी आरबीआयने बँकिंग रेग्युलेशन कायद्याच्या कलम 6(2) आणि कलम 8 मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल देशातील सर्वात मोठी खासगी बँक असणाऱ्या एचडीएफसीला दहा कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. त्याचबरोबर राज्यातील प्रियदर्शनी महिला नागरी सहकारी बँकेवर देखील नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.