JOIN US
मराठी बातम्या / मनी / RBI Governor LIVE: कोरोना काळात मोठा दिलासा! इमरजन्सी हेल्थ सेवांसाठी RBI ने दिले 50,000 कोटी

RBI Governor LIVE: कोरोना काळात मोठा दिलासा! इमरजन्सी हेल्थ सेवांसाठी RBI ने दिले 50,000 कोटी

देशात कोरोना व्हायरसचा हाहाकार (Second Wave of Coronavirus) वाढत आहे. देशात दररोज 3.50 लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे. अशावेळी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्था विशेष प्रभावित झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 05 मे: देशात कोरोना व्हायरसचा हाहाकार (Second Wave of Coronavirus) वाढत आहे. देशात दररोज 3.50 लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे. अशावेळी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्था विशेष प्रभावित झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मीडियाला संबोधित करताना दास यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे. दास यांनी असं म्हटलं आहे की, ‘दुसऱ्या लाटेविरोधात ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. या संपूर्ण परिस्थितीवर RBI ची नजर आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर काहीशी सुधारणा झाली होती’. दरम्यान आरबीआयने इमरजन्सी हेल्त सेवांसाठी मोठी घोषणा केली आहे,

भारतीय रिझर्व्ह बँक वाढत्या कोव्हिडच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि दुसऱ्या लाटेमुळे त्रस्त नागरिक,  व्यापारी संस्था आणि संस्थांसाठी सर्व संसाधने आणि उपकरणे तैनात करेल, अशी माहिती दास यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

इमरजन्सी हेल्थ सेवांसाठी 50000 कोटी आरबीआयने आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी 50,000 कोटी रुपये दिले. याद्वारे बँका लसी उत्पादक, लसी वाहतूक, निर्यातदारांना सोप्या हप्त्यांमध्ये कर्ज उपलब्ध करुन देतील. याशिवाय रुग्णालये, आरोग्य सेवा पुरवठा करणा्यांनाही हा लाभ मिळणार आहे. प्रायोरिटी क्षेत्रासाठी लवकरच कर्ज आणि इन्सेटिव्ह दिलं जाईल, असे शक्तीकांत दास यांनी सांगितले.

जाहिरात

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास असं म्हणाले की सरकारकडून लसीकरणाच्या प्रक्रियेचा वेग वाढवला जात आहे. ग्लोबर इकॉनॉमीमध्ये देखील रिकव्हरीचे संकेत आहेत. चांगल्या पावसामुळे ग्रामीण भागातही तेजीचे संकेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या