JOIN US
मराठी बातम्या / मनी / Post Office ची खास स्कीम, पती-पत्नीला मिळेल 59,400 रुपयांचा फायदा; वाचा काय आहे योजना

Post Office ची खास स्कीम, पती-पत्नीला मिळेल 59,400 रुपयांचा फायदा; वाचा काय आहे योजना

पोस्ट ऑफिस मंथली सेव्हिंग्स स्कीमच्या (Post Office MIS) माध्यमातून तुम्ही दरमहा एक फिक्स्ड कमाई करू शकता. मंथली कमाईमध्ये तुम्ही 4950 रुपये दरमहा मिळवू शकता

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 17 ऑगस्ट: पोस्ट ऑफिसकडून (Post Office) ग्राहकांच्या सोयीसाठी अनेक छोट्या बचत योजना चालवल्या जातात. भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी या योजना अत्यंत फायद्याच्या आहेत. शिवाय पोस्टाच्या या योजनांमध्ये तुम्हाला गॅरंटी देखील मिळते आणि जोखीमही कमी आहे. पोस्टाच्या अशा एका योजनेबाबत जाणून घ्या ज्या माध्यमातून पती आणि पत्नी दोघंही कमाई करू शकतात. पोस्टाच्या या खास योजनेअंतर्गत पती-पत्नी मिळून 59400 रुपये वार्षिक कमाई करू शकतात. पोस्ट ऑफिस मंथली सेव्हिंग स्कीम (Post Office MIS) असं या योजनंचं नाव आहे. तुमच्या मंथली कमाईबाबत बोलायचे झाले तर यामध्ये तुम्हाला दरमहा 4950 रुपये मिळतील. तुम्ही या योजनेत जॉइंट अकाउंट सुरू करू शकता. जाणून घ्या कसा मिळेल फायदा वार्षिक कमाई असेल इतकी या स्कीममध्ये जॉइंट अकाउंटच्या माध्यमातून तुम्हाला दुप्पट फायदा मिळेल. पती पत्नी मिळून वर्षाला 59,400 रुपयांपर्यंतची कमाई करू शकतात. काय आहे MIS स्कीम? MIS योजनेत तुम्ही सिंगल किंवा जॉइंट खातं उघडू शकता. वैयक्तिक खातं उघडल्यास तुम्ही कमीतकमी 1000 रुपये आणि जास्तीत 4.5 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. मात्र तुम्ही जॉइंट खातं उघडणार असाल तर जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा करता येतात. ही योजना निवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर आहे. या योजनेत तुम्हाला वार्षिक व्याज दर 6.6 टक्के मिळत आहे. योजनेंतर्गत तुमच्या एकूण ठेवीवरील वार्षिक व्याजानुसार परताव्याची मोजणी केली जाते. हे वाचा- Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत घसरण तर चांदी महागली; काय आहे आजचा भाव? योजनेचे फायदे? एमआयएसमधील चांगली गोष्ट अशी आहे की दोन किंवा तीन लोक एकत्रितपणे संयुक्त खाते उघडू शकतात. या खात्याच्या बदल्यात मिळणारे उत्पन्न प्रत्येक सदस्यास समान दिले जाते. संयुक्त खाती कधीही सिंगल खात्यात रूपांतरित केले जाऊ शकते. एकल खाते देखील संयुक्त खात्यात रूपांतरित केले जाऊ शकते. खात्यात बदल करण्यासाठी सर्व खाते सदस्यांचा संयुक्त अर्ज द्यावा लागेल. हे वाचा- Petrol price today: महिनाभर इंधन दरात बदल नाही, अद्यापही मुंबईत पेट्रोल शंभरीपार वार्षिक 59400 रुपयांची होईल कमाई जर तुम्ही या योजनेमध्ये जाइंट अकाउंट काढले तर तुम्हाला दुप्पट लाभ मिळेल. समजा एखाद्या पती-पत्नीने या योजनेतील जाइंट खात्यामध्ये 9 लाखाची गुंतवणूक केली आहे. 9 लाखाच्या जमा रकमेवर 6.6 टक्के व्याजदराने वार्षिक रिटर्न 59400 रुपयांचा असेल. म्हणजेच दरमहा तुम्हाला 4950 रुपये मिळतील. यामध्ये तुमची मुळ रक्कम सुरक्षित राहिल. हवे तर 5 वर्षानंतर तुम्ही आणखी 5-5 वर्षांसाठी गुंतवूकीचा कालावधी वाढवू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या