नवी दिल्ली, 19 ऑगस्ट: पेट्रोल-डिझेलचे दर 31 दिवस स्थिर राहिल्यानंतर आता (Petrol-Diesel Price Today) सलग दुसऱ्या दिवशी डिझेलच्या किंमती उतरल्या आहत. गुरुवारी सरकारी तेल कंपन्यांनी डिझेलच्या (Diesel Price Today) किंमतीत कपात केली आहे. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आज इंधनाच्या दरात हा बदल करण्यात आला, जवळपास महिनाभरापासून इंधनाचे दर बदलले नव्हते. पेट्रोलचे दर स्थिर (Petrol Price Today) असून डिझेलचे दर आज कमी झाले आहेत. यानंतर दिल्लीमध्ये पेट्रोलचे भाव 101.84 रुपये प्रति लीटर तर डिझेलचे दर 89.47 रुपये प्रति लीटर आहेत, तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 107.83 रुपये आणि डिझेल 97.04 रुपये प्रति लीटर आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी सहा वाजता रिव्हाइज करता येतात. पेट्रोलच्या दरात शेवटची वाढ 17 जुलै 2021 रोजी झाली होती. अर्थात महिनाभरापेक्षा पण जास्त कालावधीत पेट्रोलचे दर बदलले नाही आहेत. 17 जुलै रोजी देखील पेट्रोलचे दर 30 पैशांनी वधारले होते. हे वाचा- PM Kisan: हे शेतकरी आहेत अपात्र, योजनेचा लाभ मिळाला असल्यास परत घेतले जाणार पैसे 19 राज्यात पेट्रोलचे दर शंभरीपार देशभरातील 19 राज्यात पेट्रोलचे दर शंभरीपार आहेत. या यादीमध्ये मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखचा समावेश आहे. याशिवाय महानगरांमध्ये मुंबई, हैदराबाद, बंगळुरू इ. शहरात आधीपासूनच दर शंभरीपार आहेत. हे वाचा- HDFC बँकेला पुन्हा जारी करता येणार नवीन क्रेडिट कार्ड, RBIचा मोठा दिलासा काय आहेत आजचे लेटेस्ट दर » दिल्ली - पेट्रोल 101.84 रुपये आणि डिझेल 89.47 रुपये प्रति लीटर » मुंबई - पेट्रोल 107.83 रुपये और डीजल 97.04 रुपये प्रति लीटर » चेन्नई - पेट्रोल 101.47 रुपये आणि डिझेल 94.02 रुपये प्रति लीटर » कोलकाता - पेट्रोल 102.08 रुपये आणि डिझेल 92.57 रुपये प्रति लीटर