मुंबई : देशातील काही को ऑपरेटिव्ह बँका डबघाईला आल्या. त्यानंतर RBI ने अशा बँकांवर कारवाई सुरू केली. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न पुढे आला. तुमच्या खात्यावर किती पैसे असायला हवेत. किती पैसे अडकतात यामुळे पुन्हा या विषयाची चर्चा सुरू झाली आहे. आता सगळ्यांचे बँकेत खाती असतात. त्यामुळे तुमच्या खात्यावर किती पैसे असायला हवेत. टॅक्सचा नियम काय सांगतो आणि याबद्दल तज्ज्ञांचं म्हणणं काय आहे हे सविस्तर जाणून घेऊया. सेव्हिंग अकाऊंटद्वारे ग्राहकाला त्याच्या गरजांसाठी बँकेत पैसे ठेवण्याची सुविधा दिली जाते. भारतात अकाऊंट उघडण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. एखादी व्यक्ती कितीही सेव्हिंग अकाऊंट उघडू शकते. भारतात सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे जमा करण्याची मर्यादा नाही. सेव्हिंग अकाऊंटवर तुम्हाला हवे तेवढे पैसे जमा करता येतात. झिरे अकाऊंट वगळता इतर सर्व सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान शिल्लक राखणे अनिवार्य आहे. बँकेने ठरवलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम खात्यात असेल तर बँके कडून पेनल्टी लावली जाते. किती असायला हवेत पैसे तज्ज्ञ काय सांगतात सेव्हिंग अकाऊंटवर कितीही पैसे ठेवता येतात. आयकर विभागाने यासाठी रक्कम ठरवून दिलेली नाही. मात्र हे पैसे कुठून आले याचा रेकॉर्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पैसे बँकेत जमा करताना कोणतेही शुल्क आकारत नाही. उलट त्यावर व्याज देते. कर आणि गुंतवणूक सल्लागार बळवंत जैन यांनी माहिती दिली आहे. सेव्हिंग अकाऊंटवरील व्याजदर किती असावा हे त्या त्या बँकेवर ठरलेलं असतं. मात्र साधारण एकसारखाच असतो. सोलापुरातील बँकेचा परवाना रद्द, तुमची बँक बुडली तर तुम्हाला किती पैसे मिळणार?
व्याजावर भरावा लागतो टॅक्स खातेदाराला बँके च्या सेव्हिंग अकाऊंटवर ठेवलेल्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागतो. बँक व्याजावर १० टक्के टीडीएस कापला जातो. बळवंत जैन सांगतात की व्याजावर कर भरावा लागतो, पण त्यावरही कर कपातीचा लाभ घेता येतो. आयकर कायद्याच्या कलम 80TTA नुसार, सर्व व्यक्तींना 10 हजारांपर्यंत कर सूट मिळू शकते. 10 हजार रुपयांपेक्षा कमी व्याज असल्यास कर भरावा लागणार नाही. 60 वर्षांवरील खातेधारकांना 50,000 रुपयांपर्यंतच्या व्याजावर कर भरावा लागणार नाही. एकूण वार्षिक उत्पन्नामध्ये ते व्याज जोडल्यानंतरही, तुमचे वार्षिक उत्पन्न त्यावर करपात्र होण्यासाठी पुरेसे नसेल, तर तुम्ही फॉर्म 15G सबमिट करून बँकेने कापलेल्या टीडीएसाठी फॉर्म भरून पैसे परत मिळवू शकता. ऑक्टोबर महिन्यात 21 दिवस बंद बँक, वाचा तुमच्या भागातील सुट्ट्यांची यादी किती खाती असावीत? अर्थतज्ज्ञांच्या मते एका व्यक्तीची तीनपेक्षा जास्त बँकखाती असू नयेत. वेल्थ क्रिएटर्स फाइनेंशियल अॅडवाइजर्सचे को फाऊंडर विनित अय्यर यांच्या मते एक सॅलरी अकाऊंट असावं. दुसरं खातं हे रोजच्या खर्चासाठी संयुक्त पती-पत्नीचं असायला हवं. तिसरं खातं हे व्यक्तीगत खर्चांसाठी किंवा इमरजन्सी फंडसाठी असायला हवं. यापेक्षा जास्त खाती उघडणं योग्य नाही असं ते म्हणतात.