जाहिरात
मराठी बातम्या / मनी / सोलापुरातील बँकेचा परवाना रद्द, तुमची बँक बुडली तर तुम्हाला किती पैसे मिळणार?

सोलापुरातील बँकेचा परवाना रद्द, तुमची बँक बुडली तर तुम्हाला किती पैसे मिळणार?

 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया Jobs

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया Jobs

RBIच्या या निर्णयामुळे चांगलीच खळबळ उडाली. खातेधारकांना आता किती पैसे काढता येणार?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेनं सोलापुरातील लक्ष्मी को ऑपरेटिव्ह बँकेचा परावाना रद्द केला आहे. बँकेच्या या निर्णयामुळे चांगलीच खळबळ उडाली. खातेधारकांना आता किती पैसे काढता येणार? त्यांच्या पैशांचं काय होणार असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर आहेत. खातेधारकांना ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम त्यांना परत देण्याचे निर्देश RBI ने दिले आहेत. गेल्यावर्षी महाराष्ट्रातील कर्नाळा नागरी कोऑपरेटिव बँकेचा परवाना रद्द करण्यात आला होता. बँकेकडे सध्या आवश्यक तेवढे पैसे नाहीत. तसेच खातेधारकांना पैसे देणंही शक्य नसल्यानं या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला होता. आता लक्ष्मी को ऑपरेटीव्ह बँकेत खातं असणाऱ्यांचं काय होणार असा प्रश्न आहे.

रुपीनंतर महाराष्ट्रातील आणखी एका बँकेला दणका; RBI कडून परवाना कायमस्वरुपी रद्द

95 टक्के ठेवीदारांना त्यांच्या संपूर्ण ठेवी डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) मार्फत मिळतील. जर बँक बुडली, तर प्रत्येक ठेवीदाराला नवीन नियमांनुसार ठेव रकमेवर विमा दावा करण्याचा अधिकार आहे. त्याची मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

बँक बंद झाल्यानंतर ग्राहक DICGC मधून ५ लाख रुपयांपर्यंत जमा असलेल्या विमा राशीवर दावा करू शकतात. लवकरच या थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं. ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळणार असल्याचंही सांगण्यात आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात