मुंबई : तुम्ही जर एकपेक्षा जास्त बँका खाती वापत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. RBI ने काही को ओपरेटिव्ह बँकांवर टाच आणली आहे. त्यामुळे एकापेक्षा जास्त खात्यांमध्ये तुमचे पैसे असावेत की नाही यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे. तुमचं एकापेक्षा जास्त बँकेत खातं असेल तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. एकापेक्षा जास्त बँक खाती असतील तर त्यासाठी मिनिमम बॅलन्स, कार्ड, SMS आणि इंटरनेट सेवा चार्ज, इतर चार्ज अशा सगळ्यावर बँक सेवा शुल्क आकारते. मिनिमम बॅलन्स नसेल आणि अनेक महिन्यांपासून बँकेत काही ट्रॅन्झाक्शन झालं नसेल तर बँक पेनल्टी आकारते. त्यामुळे एक तर तुमचे पैसे अडकतात किंवा बँकेला पेनल्टी म्हणून जातात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे जेव्हा ITR भरायचा असतो तेव्हा तुम्हाला सगळ्या बँकांचे डिटेल्स देणं बंधनकारक आहे. अनेक खाती असल्यास तुम्हाला ITR भरताना अडचणी येऊ शकतात. एक खातं असेल तर त्यावरून लिंक करून ITR फाइल करणं सोपं जातं. EMI किंवा सेव्हिंग प्लॅनसाठी सुरू केलेल्या SIP जर वेळच्या वेळी नाही भरल्या गेल्या, खात्यात तेवढी रक्कम शिल्लक नसेल तर दंड भरावा लागतो. त्यामुळे देखील नुकसान होतं. आता युजर्सला मिळणार ‘हे’ हक्क, सरकारकडून नवीन टेलिकॉम कायदा आणण्याची तयारी तुमचं सॅलरी अकाऊंट असेल आणि ते जर तुम्ही तीन महिने वापरलं नाही किंवा त्यावर सॅलरी आली नाही तर ते सेव्हिंगमध्ये कन्व्हर्ट होतं. त्यामुळे तिथे तुम्हाला मिनिमम बॅलन्स ठेवणं बंधनकारक आहे. तसं न केल्यास बँक दंड आकारू शकते. याशिवाय तुमची फसवणूक देखील होण्याची शक्यता आहे. कारण एकापेक्षा जास्त खात्यावर तुम्ही पैसे विभागून ठेवता. त्यामुळे तुम्ही हॅकर्सच्या निशाण्यावर असता.
खुशखबर! फ्री रेशनसोबत मोदी सरकार आणतंय मोठा Plan तुम्हाला जर तुमचं एकापेक्षा जास्त बँकेतील खाती बंद करायची असतील तर तुम्ही शाखेत जाऊन त्यासाठी डिलिंकचा फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर तुमचं खातं डिलिंक करण्यात येईल. बंद झालं की नाही याची तपासणी देखील करणं गरजेचं आहे नाहीतर काहीवेळा बँका ते खातं चालू ठेवतात आणि त्यावर पेनल्टी लागते.