JOIN US
मराठी बातम्या / मनी / 18 वर्षाखालील मुलांचंही बनवता येईल PAN Card, यासाठी लागू शकते गरज

18 वर्षाखालील मुलांचंही बनवता येईल PAN Card, यासाठी लागू शकते गरज

सर्वसाधारणपणे 18 वर्षांनंतर पॅन कार्ड (PAN Card) बनवलं जातं. परंतु 18 वर्षाआधीही पॅन कार्डसाठी अप्लाय करता येऊ शकतं. तुम्ही तुमच्या मुलांच्या पॅन कार्डसाठी अप्लाय करू शकता.

जाहिरात

आता पॅन कार्ड नंबर टाका आणि Verify Your Identity पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर काही आवश्यक माहिती भरा आणि फी भरुन अकाउंट लॉगइन करा.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 मार्च : पॅन कार्ड एक अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. परमनेंट अकाउंट नंबर अर्थात पॅन (PAN) असं डॉक्युमेंट आहे जे कोणत्याही वित्तीय ट्रान्झेक्शनसाठी अतिशय महत्त्वाचं असतं. सरकारी कार्यालय ते बँक अकाउंट ओपन करण्यासाठी, सोनं खरेदीवेळी, गुंतवणुकीवेळी पॅन कार्ड आवश्यक ठरतं. सर्वसाधारणपणे 18 वर्षांनंतर पॅन कार्ड (PAN Card) बनवलं जातं. परंतु 18 वर्षाआधीही पॅन कार्डसाठी अप्लाय करता येऊ शकतं. तुम्ही तुमच्या मुलांच्या पॅन कार्डसाठी अप्लाय करू शकता. त्यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. 18 वर्षाखालील मुलं पॅन कार्डसाठी थेट अप्लाय करू शकत नाही. त्यासाठी मुलांचे आई-वडील अर्ज करू शकतात.

हे वाचा -  Facebook Alert! लगेच अ‍ॅक्टिवेट करा महत्त्वाचं फीचर,नाहीतर लॉक होईल तुमचं अकाउंट

- सर्वात आधी NSDL च्या वेबसाइटवर जा. - त्यानंतर अर्जदाराची कॅटेगरी निवडून सर्व माहिती भरा. - आता तुमच्या 18 वर्षाखालील मुलाच्या वयाचं प्रमाणपत्र आणि आई-वडिलांच्या फोटोसह सांगितलेले इतर डॉक्युमेंट्स अपलोड करा. - त्यानंतर आई-वडिलांची सही अपलोड करा. - 107 रुपये फी भरल्यानंतर फॉर्म सब्मिट करा. - त्यानंतर एक रिसिप्ट नंबर मिळेल. याचा वापर अर्जाचं स्टेटस समजण्यासाठी करू शकता. - अर्ज केल्यानंतर एक मेल येईल. - वेरिफिकेशनंतर 15 दिवसांच्या आत पॅन कार्ड घरी पोहोचवलं जाईल. 18 वर्षाखालील मुलाच्या पॅन कार्डसाठी काही आवश्यक डॉक्युमेंट्सची गरज लागेल. आई-वडिलांच्या ओळखपत्राची गरज लागेल. अर्जदाराचा पत्ता आणि ओळखपत्र द्यावं लागेल. आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड यापैकी एक डॉक्युमेंट सब्मिट करणं अनिवार्य आहे.

हे वाचा -  PAN Card Correction: घरबसल्या दुरुस्त करा पॅन कार्डमधील चूका, पाहा सोपी पद्धत

18 वर्षाखालील मुलांना कधी लागते पॅन कार्डची गरज - अल्पवयीन स्वत: कमवत असेल तर पॅन कार्डची गरज असते. तसंच आई-वडिलांना आपल्या गुंतवणुकीत मुलाला नॉमिनी ठेवायचं असल्यास किंवा मुलाच्या नावावर गुंतवणूक केली असल्यास पॅन कार्डची गरज लागू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या