JOIN US
मराठी बातम्या / मनी / आता Aadhaar नंबरने काढता येणार पैसे; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रोसेस

आता Aadhaar नंबरने काढता येणार पैसे; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रोसेस

या सुविधेअंतर्गत ग्राहकांचा मोबाईल नंबर आणि फिंगरप्रिंट, डेबिट कार्डप्रमाणे काम करतं. त्यामुळे ATM कार्डवेळी वापरला जाणारा पीन नंबरही टाकावा लागणार नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : एटीएमप्रमाणे आता आधार कार्डद्वारे पैसे काढता येणार आहेत. पण यासाठी आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक असणं आवश्यक आहे. ग्राहक Aadhaar इनेबल्ड पेमेंट सिस्टम सर्व्हिसद्वारे (AePS) बँकेत जमा असलेली रक्कम काढू शकतात. देशात आता एटीएम कार्ड, पीनशिवाय बँकिंग व्यवहार करता येणार आहेत. कसे काढाल पैसे - आतापर्यंत सर्वच जण एटीएम-डेबिट कार्डच्या मदतीने पैसे काढत होते. पण आता हेच काम आधार कार्डच्या साहाय्याने करता येणार आहे. Aadhaar आधारित ATM मशीनद्वारे पैसे काढता येणार आहेत. हीदेखील कामं करता येणार - पैसे काढण्याशिवाय, पैसे भरण्यासाठी अर्थात कॅश डिपॉजिट, बॅलेन्स चेक करणं, मिनि स्टेटमेंट काढणं आणि याद्वारे कर्ज देखील घेता येईल. एवढंच नाही, तर पॅन कार्ड, ई-केवायसी आणि कर्ज वितरणाच्या सुविधाही याच्यामार्फत दिल्या जातील.

(वाचा -   आता ATM प्रमाणे होणार तुमचं आधार कार्ड, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस )

 काय आहे आधार AEPS?

Aadhaar आधारित पेमेंट (AEPS) नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) तयार केलं आहे. याद्वारे बँक आणि वित्तिय संस्था आपल्या सेवा देण्यासाठी आधार नंबर आणि यूआयडीएआय (UIDAI) ऑथेंटिकेशनचा वापर करतात. याला आरबीआयची (RBI) मान्यताही मिळाली आहे. या सुविधेअंतर्गत ग्राहकांचा मोबाईल नंबर आणि फिंगरप्रिंट, डेबिट कार्डप्रमाणे काम करतं. त्यामुळे ATM कार्डवेळी वापरला जाणारा पीन नंबरही टाकावा लागणार नाही.

(वाचा -  दुकानदार कॅरी बॅगचे जास्त पैसे घेतो? आता इथं करा तक्रार; होणार कारवाई )

Aadhaar मायक्रो एटीएम - - आधार मायक्रो एटीएम संशोधित POS (पॉइंट ऑफ सेल) डिव्हाईसप्रमाणे काम करतं. - पीनलेस बँकिंगला प्रोत्साहन देणं हा यामागचा उद्देश आहे. - याप्रकारच्या ट्रान्झक्शेवर कोणताही चार्ज लागत नाही. - एटीएमप्रमाणे यात कॅश-इन आणि कॅश-आउट होणार नाही, तर आधार मायक्रो एटीएमद्वारा हे चालवलं जाईल.

(वाचा -  ..अन्यथा अडचण वाढणार; वाहनांवरील Number Plate बाबत RTO ची महत्त्वपूर्ण घोषणा )
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या