JOIN US
मराठी बातम्या / मनी / क्रिप्टोकरन्सीमुळे आर्थिक मंदी येणार? पाहा काय म्हणाले RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास

क्रिप्टोकरन्सीमुळे आर्थिक मंदी येणार? पाहा काय म्हणाले RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास

ब्लूमबर्गच्या एका सर्व्हेत ६० टक्के अर्थतज्ज्ञांनी अमेरिकेत मंदी असल्याचं मान्य केलं आहे.

जाहिरात

रिझर्व्ह बँक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई: जगातील अनेक देश गंभीर आर्थिक मंदी च्या विळख्यात सापडले असल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. मात्र भारतातील आर्थिक उलाढाल ही भक्कम असल्याचंही त्यांनी म्हटलं. ब्लूमबर्गच्या एका सर्व्हेत ६० टक्के अर्थतज्ज्ञांनी अमेरिकेत मंदी असल्याचं मान्य केलं आहे. २०२३ मध्ये आर्थिक मंदी येऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र भारतात आर्थिक मंदीबाबत वर्ल्ड बँक आणि अनेक मोठ्या एजन्सींनी शक्यता फेटाळून लावली आहे. CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार शक्तिकांत दास म्हणाले की, कठोर आर्थिक नियम लादल्यास देशाच्या विकासावर परिणाम होईल. येत्या काही दिवसात डिपॉझिट रेट आणखी वाढू शकतात. बँकेत जमा दरांमध्ये दीड टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर एफडीवर दर वाढण्याची शक्यता आहे.

कोणती बँक सीनियर सिटीझना FD वर देते सर्वात जास्त दर

क्रिप्टोबाबत आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मोठं वक्तव्य केलं. त्यांनी म्हटलं की, डिजिटल करन्सी ही भविष्यातील मोठी करन्सी असेल. जगभरातील केंद्रीय बँका डिजिटल करन्सीला प्रोत्साहन देतील. मात्र क्रिप्टो करन्सी जगभरात आर्थिक मंदीचे कारण बनू शकते. कारण क्रिप्टो करन्सी पूर्णपणे अंदाजावर आधारीत आहे.

EPFO Updates : नॉमिनी नसेल तर कुटुंबाला पैसे मिळणार का? काय सांगतो नियम

गेल्या महिन्यात अनेक एक्सचेंज बंद झाले आहेत. जर दराबद्दल बोलायचं झालं तर क्रिप्टो करन्सी या वर्षी ६० ते ९० टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. बिटकॉइनने मार्च महिन्यात ३० हजार डॉलरच्या वर गेला होता. त्यानंतर घसरण सुरू होऊन आता १४ हजार डॉलरवर दर आले आहेत.

क्रेडिट कार्डचे प्रकार तुम्हाला माहिती आहेत का? फायदेही समजून घ्या

संबंधित बातम्या

आर्थिक मंदी म्हणजे काय? कोणत्याही देशासाठी आर्थिक मंदी एक मोठं संकट असतं. गेल्या काही काळात देशासह जगभरात आर्थिक मंदी येईल असं म्हटलं जात आहे. जेव्हा एखाद्या देशात आर्थिक मंदी येते तेव्हा अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं. जीडीपमध्ये घसरण, दरडोई उत्पन्न कमी आणि महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडते. तसंच मंदीमुळे कंपन्या खर्च कमी करते आणि अशा वेळी कर्मचारी कपातीचा फटकाही अनेकांना बसतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या