रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेपो रेटमध्ये वाढ केली. त्यामुळे 0.35 टक्क्यांनी रेपो रेट वाढला, यासोबत लोन आणि EMI देखील महाग झाले आहेत. बँकांनी एकीकडे लोन आणि EMI महाग केले तर दुसरीकडे FD वर जास्त व्याजदर देऊन ग्राहकांना आकर्षित केलं आहे.
2/ 10
FD मध्ये गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित मानली जाते. त्यामुळे बहुतांश लोकांची FD करण्याला पहिली पसंती असते. कोणती बँक सीनियर सिटीझनना जास्त FD वर व्याज देते आज जाणून घेऊया. तुमच्या घरात जर वयोवृद्ध व्यक्ती असतील तर त्यांच्या नावे तुम्ही पैसे ठेवले तर जास्त फायदा होईल.
3/ 10
SBI Bank- ही बँक वृद्ध नागरिकांसाठी 7.25% FD वर व्याजदर देते. नुकतेच 50 बेसिस पॉईंटने त्यांनी व्याजदरात वाढ केली आहे. 3.5 ते 7.25 टक्क्यांपर्यंत पैसे आणि कालावधीनुसार हे दर लागू करण्यात आले आहेत.
4/ 10
7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत तुम्हाला FD ठेवता येते. त्यासाठी वेगवेगळे व्याजदर आहेत. वयोवृद्धांसाठी बँकेनं दिलेल्या माहितीनुसार 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी - 7.25% 2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी -7.25% आणि 5 वर्षे आणि 10 वर्षांपर्यंत -7.25%
5/ 10
HDFC Bank - ही बँक वृद्ध नागरिकांना 3.5 ते 7.75% पर्यंत व्याजदर देते. यामध्ये 7 दिवसांपासून ते 10 वर्षांचा कालावधी आहे. हे नवे दर 14 डिसेंबरपासून लागू करण्यात आले आहेत.
6/ 10
1 वर्ष ते < 15 महिने 7.००%, 15 महिने ते < 18 महिने 7.50%, 18 महीने से < 21 महीने 7.00%, 21 महीने- 2 साल 7.50%, 2 वर्ष 1 दिवस -3 वर्ष 7.50%, 3 वर्ष 1 दिवस ते - 5 वर्षे 7.50%, 5 वर्ष 1 दिवस - 10 वर्षे 7.75%
7/ 10
ICICI Bank - ही बँक वृद्ध नागरिकांना 3.5 ते 7.50% पर्यंत व्याजदर देते. 7 दिवसांपासून 10 वर्षांच्या कालावधीसाठी हे व्याजदर ग्राहकांना मिळतं. हे नवे दर 16 डिसेंबर पासून लागू करण्यात आले आहेत.
8/ 10
1 वर्ष ते 389 दिवस 7.10% , 390 दिवस ते < 15 महीने 7.10% , 15 महिने ते < 18 महिने 7.50%, 2 आणि 3 वर्षांसाठी देखील 7.50 टक्के व्याजदर लागू करण्यात आलं आहे. 5 वर्षांहून अधिक काळ FD ठेवणाऱ्यांना 7.50 टक्के व्याजदर मिळणार आहे.
9/ 10
Yes Bank- ही बँक 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 3.75% ते 7.50% व्याजदर देते. 9 डिसेंबरपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. 1 वर्ष 20 महिने 7.50% FD ठेवणाऱ्यांना इतकं व्याजदर मिळणार आहे.
10/ 10
Kotak Mahindra bank- 3.25% ते 7.50% फिक्स डिपॉझिटवर व्याजदर दिलं जाणार आहे. 7 दिवस ते 10 वर्षांसाठी हे व्याजदर लागू करण्यात आलं आहे. 365 दिवस ते 389 दिवसांपर्यंत जे FD ठेवतील त्यांना 7.25% टक्के व्याजदर मिळेल.