मुंबई: कर्मचाऱ्यांसाठी नोकरीच्या ठिकाणी बेसिक पगाराच्या 12 टक्के रक्कम ही EPFO खात्यात जमा केली जाते. याच EPFO खात्यासाठी तुम्हाला नॉमिनी भरणं अत्यावश्यक असतं. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) खातेधारकांना नॉमिनी जोडण्यासंदर्भात अनेकदा नोटिफिकेशन दिलं आहे. नॉमिनी असल्यावर ईपीएफ क्लेम करून पैसे काढणं अधिक सोपं होतं. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे पैसे नॉमिनिला काढता येतात किंवा ते दिले जातात. त्यामुळे ईपीएफ सबस्क्रायबर्ससाठी नॉमिनेशन करणं फायद्याचं ठरतं. जर नॉमिनी नसेल तर तुमचे पैसे मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. एखाद्याने नॉमिनेशन केले नसेल तर ईपीएफ खातेदाराच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंबीय त्याचे पैसे काढू शकत नाहीत, असेही नाही. जरी एखाद्या ग्राहकाने आपला नॉमिनी घोषित केला नसेल, तरीही फॉर्म 20 भरून त्याच्या कुटुंबाला क्लेम मिळू शकतो.
Social Media : फोन किंवा सोशल मीडियावर खासगी माहिती शेअर करताय, हे वाचून बसेल धक्कापैसे कोणाला मिळणार? जर ईपीएफ खातेधारकाचा नॉमिनेशनशिवाय मृत्यू झाला तर कुटुंबातील सदस्यांना पैसे काढण्यासाठी फॉर्म 20 भरावा लागतो. ‘ईपीएफओ’चा नियम आहे की, जर ग्राहकाने नॉमिनेशन केले नसेल आणि त्याचा मृत्यू झाला असेल तर ईपीएफमध्ये जमा झालेले पैसे कुटुंबातील सदस्यांमध्ये समान प्रमाणात वाटले जातात. फॉर्म 20 भरणे आवश्यक आहे. ईपीएफ खातेदाराच्या कुटुंबीयांना फॉर्मचे पैसे मिळवण्यासाठी फॉर्म 20 भरणं गरजेचं आहे. यामध्ये पैसे मिळण्याचा हक्क असलेल्या कुटुंबातील सदस्यांची नावं द्यायची आहेत. ज्या कंपनीत ईपीएफ ग्राहक काम करायचा त्या कंपनीकडून कुटुंबातील सदस्यांची माहिती दिली जाते.
आता रिजेक्शनचं टेन्शन नाही! आता थेट तुमच्या खात्यात येणार पैसेजर कोणत्याही कारणास्तव कंपनी ही माहिती देऊ शकत नसेल तर कुटुंबातील सदस्यांची यादी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडून प्रमाणित करून सादर करावी लागेल. फॉर्म 20 बरोबरच मृत्यूपत्राची फोटोकॉपी आणि रद्द झालेला चेकही जोडावा लागणार आहे.
क्लेम रिजेक्ट व्हायचं टेन्शन नाही, EPFO नं आणलाय नवा नियमजर ग्राहकाने इच्छापत्र केले असेल तर क्लेम मिळण्यास जास्त वेळ लागू शकतो. हे घडते कारण इच्छापत्राचे यश प्रमाणपत्र द्यावे लागते. भविष्यात असा दावा अन्य कुणीही करू नये, यासाठी हे सावधगिरीने केले जाते. हे तपासण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे केलेला क्लेम मिळण्यासाठी उशीर होण्याची शक्यता आहे.