Netflix
मुंबई, 25 जानेवारी: स्ट्रिमिंग दिग्गज नेटफ्लिक्स या वर्षी पासवर्ड शेअरिंग फीचर बंद करणार असल्याची चर्चा होती. याला आता कंपनीने दुजोरा दिला आहे. या शिवाय कंपनी, ऑनलाइन स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मसाठी जाहिरात-समर्थित टियर रोल आउट करणार आहे. कंपनीनं केलेल्या या बदलांमध्ये भारताचाही समावेश आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे, नेटफ्लिक्स चा आनंद घेण्यासाठी जे आपल्या मित्रांवर आणि इतरांवर अवलंबून होते त्यांना लवकरच पैसे मोजावे लागतील. नेटफ्लिक्सचे दोन नवीन सह-मुख्य कार्यकारी अधिकारी (को-सीईओ) टेड सारांडोस आणि ग्रेग पीटर्स यांनी ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत पासवर्ड शेअरिंगबाबत अधिक तपशील उघड केले. पासवर्ड शेअर करण्यासंबंधीचं नवं धोरण नियंत्रित पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं अवलंबताना नेटफ्लिक्सवरील कंटेंट पाहण्याच्या ग्राहकांच्या अनुभवाला अजिबात धक्का लागू नये, याची काळजी हा व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म घेणार आहे. पासवर्ड शेअरिंगसाठी ग्राहकांना किती पैसे द्यावे लागतील असं विचारले असता, पीटर्स म्हणाले की, व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मनं अशा सर्व ग्राहकांना परत मिळवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. ऑनलाइन स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मचा भारतासारख्या राष्ट्रांवर लक्ष केंद्रित करून 15 ते 20 दशलक्ष ग्राहकांची संख्या वाढवण्याचा मानस आहे, असं ब्लूमबर्गच्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. या शिवाय कंपनीनं आपल्या शेअर होल्डर्सना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, “आम्ही Q1’23 नंतर अधिक व्यापकपणे पेड शेअरिंग सुरू करण्याची अपेक्षा करत आहोत. आमचा अंदाज आहे की, 2023 मध्ये वेगळ्या त्रैमासिक पेड नेट अॅड पॅटर्नमध्ये याचा परिणाम होईल. Q1'23 पेक्षा Q2'23 मध्ये पेड नेट अॅड जास्त असण्याची शक्यता आहे.” यंदाच्या बजेटमध्ये Income Tax लिमिट वाढणार? नोकरदार वर्गाला ‘या’ आहेत अपेक्षा नेटफ्लिक्सला याची जाणीव आहे की, या निर्णयानंतर लॅटिन अमेरिकेतील बाजारपेठांमध्ये ‘कॅन्सल रिअॅक्शन’ दिसू शकते. निअर-टर्म मेंबर ग्रोथवर त्याचा परिणाम होऊ शकतो. पण, एकदा बॉरोअर कुटुंबांनी त्यांची स्वतःची स्वतंत्र खाती अॅक्टिव्ह करणं सुरू केलं आणि अतिरिक्त सदस्य खाती जोडली गेली की, कंपनीला चांगला एकूण महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. ही सर्व योजना आणि किंमतीमधील बदलांचं लक्ष्य आहे. जिओ ट्रू 5G चं जाळं विस्तारलं; देशभरातल्या आणखी 50 शहरांमध्ये आजपासून जिओची 5G सेवा सुरू! नेटफ्लिक्स एका खात्याचा वापर एका कुटुंबासाठी मर्यादित करत आहे. पण, ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी काही नवीन फीचर्स देऊ केली आहेत. युजर्स आता आपल्या अकाउंटचा वापर कोणकोणत्या डिव्हाईसमध्ये होत आहे, हे तपासू शकतात आणि नवीन अकाउंटमध्ये प्रोफाइल हस्तांतरित करू शकतात. या शिवाय, युजर्सना आपलं अकाउंट कुटुंबाबाहेरील सदस्यांसोबत शेअर करण्यासाठी अतिरिक्त पैसे देण्याचा पर्यायदेखील असेल.
“आम्ही पेड शेअरिंग सुरू केलं आहे. त्यामुळे जर सदस्यांना त्यांच्या कुटुंबियांव्यतिरिक्त इतर कुणाशी नेटफ्लिक्स शेअर करायचं असेल तर त्यांना अतिरिक्त पैसे देण्याचा पर्यायही असेल. अनेक देशांमध्ये ही सुविधा दिली जाईल,” असं कंपनीनं म्हटलं आहे. सध्याप्रमाणे, सर्व सदस्य प्रवास करताना टीव्ही किंवा मोबाईल डिव्हाईसवर नेटफ्लिक्सचा वापर करण्यास सक्षम असतील.