'हे' आहेत भाडेकरुचे अधिकार

आणखी पाहा...!

अनेक लोक हे भाड्याच्या घरात राहतात.

यातील अनेकांना घरमालकाकडून त्रास सहन करावा लागतो. 

यासाठी आज आपण भाडेकरुचे अधिकार जाणून घेणार आहोत. 

घरमालक करार पूर्ण होईपर्यंत भाडेकरुला घराबाहेर काढू शकत नाही. 

2 महिने भाडे भरले नाही तरी भाडेकरुला लगेच घरातून काढता येत नाही. 15 दिवसांची नोटीस आवश्यक.

घरमालकाला कोणत्याही कामासाठी घरी यायचे असल्यास भाडेकरूला किमान 24 तास अगोदर लेखी सूचना देऊन कळवावे.

करारातील नियमांचे उल्लंघन केले तरीही भाडेकरुला घराबाहेर काढण्यापूर्वी 15 दिवसांची नोटीस देणे गरजेचे. 

भाडे वाढवण्याच्या किमान 3 महिने अगोदर नोटीस द्यावी. 

वीज कनेक्शन, पिण्याचे शुद्ध पाणी, पार्किंग या सुविधा मागणे भाडेकरुचा हक्क.

रेंट अ‍ॅग्रीमेंटनंतर घराच्या रचनेला तडे गेल्यास त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी घरमालकाची आहे.

घरमालक त्याचे नूतनीकरण करण्याच्या स्थितीत नसेल तर भाडेकरू घराचे भाडे कमी करण्यास सांगू शकतो.

भाडेकरूचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास, घरमालक त्याच्या कुटुंबाला घर रिकामे करण्यास सांगू शकत नाही.