नवी दिल्ली, 04 सप्टेंबर: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मुंबईतील बाँबे मर्केंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेवर (Bombay Mercantile Co-operative Bank) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 50 लाखांचा दंड ठोठावला आहे. केवायसी (Know Your Customer) नियमातील काही तरतुदींचे पालन न केल्याने आरबीआयने अकोला जिल्ह्यातील केंद्रीय सहकारी बँक लिमिटेड, अकोला या बँकेवर देखील दोन लाखांचा दंड ठोठावला आहे. मुंबईतील या सहकारी बँकेवर का ठोठावला दंड? RBI ने जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की, बाँबे मर्केंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयचा (सहकारी बँकेतील ठेवींवरील व्याजदर) निर्देश, 2016 अंतर्गत येणारे निर्देश आणि सुपरवायझरी अॅक्शन फ्रेमवर्क (SAF) अंतर्गत दिशानिर्देशांचे पालन न केल्याबद्दल बँकेवर दंड आकारण्यात आला आहे. हे वाचा- Gold Price Today: घसरण होऊनही सोन्याचे दर 47 हजारांपार, चांदीला मात्र झळाळी केंद्रीय बँकेने जारी केलेल्या आणखी एक वक्तव्यामध्ये असं म्हटलं आहे की, 31 मार्च 2019 रोजी मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक स्थितीवर आधारित तपासणी अहवालात असे दिसून आले आहे की बँक संशयास्पद व्यवहारांचा प्रभावी शोध आणि देखरेखीचा भाग म्हणून अलर्टसाठी एक मजबूत यंत्रणा स्थापन करण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे बँकेला दंड ठोठावण्यात आला. Axis बँकेवरही ठोठावला होता दंड रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही दिवसांपूर्वी अॅक्सिस बँक लिमिटेडवर देखील केवायसी संबंधित काही तरतुदींचे पालन न केल्याप्रकरणी दंड ठोठावला होता. या महत्त्वाच्या खासगी बँकेवर केंद्रीय बँकेने 25 लाखांचा दंड आकारला होता. केंद्रीय बँकेने अशी माहिती दिली आहे की, फेब्रुवारी आणि मार्च 2020 दरम्यान बँकेच्या एका ग्राहकाच्या खात्याची तपासणी केली गेली. त्यात असे आढळून आले होते की, बँक आरबीआयच्या (RBI) केवायसी संदर्भातील निर्देश, 2016 चे पालन करण्यात अपयशी ठरली आहे. हे वाचा- आज इंधनाचे दर उतरले की वधारले? इथे तपासा पेट्रोल-डिझेलचे लेटेस्ट भाव ग्राहकांवर काय होणार परिणाम? RBI ने काही नियम किंवा तरतुदींचे पालन न केल्याने किंवा नियमांचे उल्लंघन केल्याने हा दंड ठोठावला आला आहे. त्यामुळे याचा ग्राहकांवर काही परिणाम होणार नाही. आरबीआयने हे स्पष्ट केले आहे की, बँकावर ही कारवाई Regulatory compliance मध्ये कमतरता असल्यामुळे करण्यात आली आहे. ग्राहकांच्या कोणत्याही व्यवहारावर याचा परिणाम होणार नाही.