JOIN US
मराठी बातम्या / मनी / Mhada Lottery 2023 : म्हाडाने बदलले नियम, घरासाठी अर्ज करण्याआधी वाचाच नाहीतर....

Mhada Lottery 2023 : म्हाडाने बदलले नियम, घरासाठी अर्ज करण्याआधी वाचाच नाहीतर....

Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची, आताच पाहा नाहीतर होईल नुकसान

जाहिरात

MHADA Lottery 2023 Rule change

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : कोरोनानंतर पहिल्यांदाच म्हाडाने मोठी लॉटरी काढत आहे. मुंबई , पुणे नागपूर इथे म्हाडाकडून लॉटरी काढण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची आणि प्रोसेसिंग फी भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिवस 5 फेब्रुवारी असेल अशी माहिती मिळाली आहे. म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी फेब्रुवारी- मार्च दरम्यान काढली जाणार आहे. म्हाडाने काही नियमांमध्येही बदल केला आहे. लॉटरी पद्धतीने निवड झाल्यावर अर्जदारांना आपली कागदपत्रे द्यावी लागतात. पूर्वीच्या तुलनेत अर्ज करणाऱ्याला आता अर्ज करताना त्यांची कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. त्यामध्ये विलंब झालेला चालणार नाही. याआधी एखादं कागदपत्र नसेल तर तुम्हाला सादर करायला पुढची वेळ दिली जात होती. मात्र आता तसं होणार नाही. म्हाडा अल्प, मध्यम आणि उच्च अशा तिन्ही वयोगटांसाठी ही लॉटरी काढणार आहे. उच्च उत्पन्न गटातील (एचआयजी) ५० सदनिकांचा समावेश आहे. किंमतीचा निर्णय अद्याप झालेला नाही. नियमात बदल करण्यामागचं कारण म्हणजे त्यामध्ये होणारे घोटाळे आणि भ्रष्टाचाराला आळा घालणं हा त्यामागचा उद्देश आहे.

Mhada Lottery 2023 : आता 21 नाही तर फक्त 7 कागदपत्र जमा करा आणि घर घ्या

काही वर्षांपूर्वी लॉटरी ही मॅन्युअली काढली जात होती. मात्र त्यामध्ये अनेक घोटाळे होऊ लागले. सिडकोने शून्य मानवी हस्तक्षेप असलेली पूर्ण सिस्टिमवर चालणारी व्यवस्था सुरू केली. मात्र, ही कागदपत्रे म्हाडाकडे पडताळणीसाठी गेली की, त्यामध्ये गैरप्रकार होतात असं समोर आलं. त्यामुळे कागदपत्र पडताळणीतला मानवी हस्तक्षेपच काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण यंत्रणा आता सिस्टिम बेस ठेवण्यात आली आहे. ज्यामुळे गैरप्रकार रोखण्यासाठी मदत होईल असा म्हाडाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. ज्यांची कागदपत्र पूर्ण आहेत असेच नागरिक म्हाडाच्या लॉटरीमध्ये सहभागी होऊ शकतात आणि लॉटरीनंतर त्यांना घर मिळालं तर ते पुढील प्रोसेस करू शकतात. अन्यथा एक जरी कागदपत्र नसेल तर तुम्हाला लॉटरीत सहभागी होता येणार नाही.

पहिल्यांदाच म्हाडाचं रजिस्ट्रेशन करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा

संबंधित बातम्या

नव्या पद्धतीत अर्जदारांना त्यांची ओळखपत्रे आणि अधिवास व उत्पन्नाचे दाखले सादर करावं लागेल. त्यानंतर अर्ज करण्याची परवानगी मिळेल. त्यासोबत त्यांना कोणत्या श्रेणीतील घर द्यायचं याचा निर्णय म्हाडा घेणार आहे. आरक्षित कोट्यासाठीचे कागदपत्र आधीच जमा करणे आवश्यक असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या