JOIN US
मराठी बातम्या / मनी / घरबसल्या अशाप्रकारे करा तुमचं PAN Card व्हेरिफाय, 2 मिनिटांत होईल काम

घरबसल्या अशाप्रकारे करा तुमचं PAN Card व्हेरिफाय, 2 मिनिटांत होईल काम

पॅन कार्ड (PAN Card) हे अत्यंत महत्त्वाच्या दस्तावेजांपैकी एक आहे. विविध आर्थिक कामांसाठी पॅन कार्ड महत्त्वाचे आहे. अशावेळी तुमचे पॅन कार्ड व्हेरिफाय केलेले असणे अत्यंत आवश्यक आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 28 जानेवारी: पॅन कार्ड (PAN Card) हे अत्यंत महत्त्वाच्या दस्तावेजांपैकी एक आहे. विविध आर्थिक कामं, फायनान्शिअल ट्रान्झॅक्शन (Financial Transaction) याकरता पॅन कार्ड महत्त्वाचे आहे. या कामांव्यतिरिक्त एक ओळखपत्र म्हणून देखील पॅन कार्डचा वापर केला जातो. यावर 10 अंकी यूनिक अल्फान्य़ूमेरिक (alphanumeric) नंबर असतो, तो क्रमांक तुमची ओळख असते. आयकर विभागाकडून हे कार्ड जारी केले जाते. अशावेळी तुमचे पॅन कार्ड व्हेरिफाय केलेले असणे अत्यंत आवश्यक आहे. कशाप्रकारे कराल व्हेरिफाय? -सर्वात आधी तुम्हाला इनकम टॅक्सची अधिकृत वेबसाइट www.incometaxindiaefiling.gov.in वर जावे लागेल -या पोर्टलवर Verify Your PAN details वर क्लिक करा -त्यानंतर तुमचा पॅन क्रमांक याठिकाणी एंटर करा -मग तुमचे नाव आणि जन्मतारीख प्रविष्ट करा -त्यानंतर कॅप्चा कोड टाकून डिटेल्स व्हेरिफाय करण्यासाठी सबमिटवर क्लिक करा (हे वाचा- 1 फेब्रुवारीपासून होणार हे 5 मोठे बदल, तुमच्या आयुष्यावर करणार थेट परिणाम ) बनवू शकता Instant Pan Card आयकर विभागाच्या मते इन्स्टंट पॅन सुविधेअंतर्गत आधार कार्डच्या माध्यमातून ई-पॅन कार्ड जारी होण्यासाठी साधारण 10 मिनिटांचा वेळ लागतो. या सुविधेअंतर्गत साधारण 7 लाख पॅन कार्ड जारी करण्यात आले आहेत. पॅन कार्ड बनवण्यासाठी लागतील ही कागदपत्र पॅन कार्ड बनवण्यासाठी संबंधित व्यक्तीकडे ओळखपत्र, वास्तव्याचा दाखला आणि जन्मतारखेची ओळख ही कागदपत्र असणं आवश्यक आहे. ओळखपत्रांसाठी तुम्हाला काही पर्याय दिले जातील. यापैकी एकाची निवड करून तुम्ही ते सबमिट करू शकता (हे वाचा- ‘नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल पण…’, IMF चा मोलाचा सल्ला ) कसं मिळवाल मोफत PAN Card? -सर्वात आधी https://www.incometaxindiaefiling.gov.in/home या वेबसाइटवर जा -याठिकाणी असणाऱ्या Instant PAN through Aadhaar या पर्यायावर क्लिक करा -नवीन पेज ओपन झाल्यानंतर Get New Pan वर क्लिक करा -आता नवीन पेजवर तुम्हाला आधार कार्ड क्रमांक प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल. आधार क्रमांक टाकून ‘I Confirm’ ला टिक करा -तुमच्या रजिस्टर्ड क्रमांकावर त्यावेळी ओटीपी येईल, जो या साइटवर टाकून व्हेरिफाय करा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या